आमचे प्रेरणास्थान

                                          सिन्नरभूषण ,   माजी आमदार  कै .मा. सूर्यभान गडाख  [नानासाहेब]
 ,                                        संस्थापक अध्यक्ष -माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर  
                                         संस्थापक  - मुसळगाव   सह .औद्योगिक वसाहत सिन्नर 



                            || झाले बहु ,होतील बहु|         
                                              परी या सम नाही .||  
                  

           कै .मा .सूर्यभान  गडाख [नानासाहेब ]

संपूर्ण  नाव ; -   मा .  कै .श्री . सूर्यभान सुकदेव  गडाख [नानासाहेब ]
शैक्षणिक पात्रता ;- सातवी
संस्थापक अध्यक्ष ;-  १]सहकारी आद्योगिक सहकारी वसाहत मुसळगा,सिन्नर
                          २] माध्यमिक लोकशिक्षण मंडळ ,सिन्नर
अवगत भाषा ;-       मराठी, हिंदी , इग्रजी
परदेश दौरा ;-        जपान .रशिया .,शिगांपूर ,यु.एस. ए.  युरोप , नेपाल  मलेशिया इ .  
पुरस्कार;-] औद्योगिक वसाहतीचा यशस्वी संस्थापक पुरस्कार सन ;-१९९४-९५  
         २] सिन्नर भूषण पुरस्कार सन १९९७ -९८  

             
        ३ ] गिरणा गौरव पुरस्कार नाशिक सन ;-१९९९ -२०००
         ४  ]  जीवन गौरव पुरस्कार २०१६-१७
            
गुण  ;- वक्तशीरपणा , स्पष्टवक्तेपणा,नेतृत्व  , शिस्त, विद्वता , नम्रता,  धाडसीपणा ,माणुसकी व संपन्नता हे गुण नानाच्या ठायी आहेत .
कौटुंबिक  पाश्वर्भूमी;-
सिन्नर तालुक्यातील देवपूर या ग्रामीण भागात ११ जानेवारी १९२७ रोजी नानासाहेबाचा  सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला .देवपूर परिसर व रानेखानाचा वाडा  या परिसरात  बालपण गेले . लहानपणापासूनच  घरची परिस्थिती नाजूकच होती . शेतीत काम करावे लागत . त्यातच १६ व्या वर्षी मातृ पितृ चे छत्र   हरवले . प्राथमिक शिक्षण कसेबसे सातवी पर्यंत देवपूर गावातच झाले .लहान पणापासूनच  परखड स्वभाव व स्पष्टवक्तेपणा अंगी  होता .
सामाजासेवेचे बाळकडू लहानपणीच स्वभात असल्याने शाळा अर्धवट सोडून समाजकार्यासाठी स्वताला झोकून दिले .
समाज कार्याची सुरवात ;-
देवपूर गावात अभ्यास शिबिरे घेणे ,गरिबांना मढत करणे .,किसान वाचनालय चालवणे ,भूमिहीन हरिजनांना जमीन मिळवून देणे .ह्या कार्यातून समाजसेवा सुरु केली .
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात उत्स्फृत सहभाग घेवून नेतुत्व केले .याच काळात   शाहीर अमरशेख ,अण्णाभाऊ साठे काकासाहेब वाघ ,शामराव परुळेकर या क्रातीकारकाच्या विचाराचा सहवास  लाभला .
राज्य व्यापी लोककला महोत्सव ;-
 शाहीर परशराम च्या पुण्यतिथी निमित्त  राज्यव्यापी लोककला महोत्सवाचे आयोजन १९४९ मध्ये देवपूर  या गावी केले .होते . या शिबिरात मा. नानासाहेब  गडाख यांनी या कार्यक्रमाची धुरा  सांभाळी .या शिबिरातूनच खर्या अर्थाने नानासाहेब घडले .महाराष्ट्रातील सर्व कलावंतानी हजेरी लावली .शाहीर ,लेखक कीर्तनकार भारुडी असे कला सादर  करणारे कलावंताबरोबरच  कातीसिंह नानापाटील ,भाऊसाहेब राउत ,काकासाहेब वाघ , यशंवत राव चव्हाण याच्या सारख्या विचारवंत ,क्रांतिकारक याचा सहभाग होता .
कलापथाकातून लोकप्रबोधन  नानांनी सुरु केले .प्रचाराचे प्रभावी साधन म्हणून पुढे  वापर  झाला. शाहीर अमरशेख ,अण्णाभाऊ साठे शाहीर आत्माराम पाटील याच्या बरोबर काम करत ,कला व कलावंताची कदर नानांनी त्या काळात ३० वर्षापुर्वीच केली होती .
तुरुंगावास ;- १९५२ मध्ये भूमिहीनांना शासनाने  जमीन द्यावी ह्यासाठी दादासाहेब गायकवाड याच्या समवेत मोढे आंदोलन उभे केले .नानांना ८ ते १० वेळा तुंरुगवास भोगावा लागला .
निवडणुकीत जनतेचा  सेवक म्हणून कार्य ;-
धडाडीचे नेतृत्व  गुण असल्यामुळे जिल्हा लोकल बोर्ड व जिल्हा परिषदेच्या  निवडणुका नानांनी विळा हातोडा या चिन्हावर लढवल्या .१९६२,१९६७,१९७२ च्या नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या  निवडणुका नानांनी लढल्या व जिंकल्या . या काळात सलग १५ वर्ष सभापती कामाचा ठसा उमटविला .दुष्काळ निवारण्यासाठी सामाजिक कार्य .;-
पाझार तलाव संकल्पना  ;- 
आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून दुष्काळ हटवण्यासाठी ‘पाझार तलाव’ बांधण्यावर  भर दिला .”पाणी आडवा ,पाणी जिरवा “ हा कार्यक्रम राबवून छोटे मोठे ३०० पाझर तलावाचे काम केले .याचा फायदा पुढे शेतीला व शेतकऱ्यांना झाला .
 दुष्काळात रोजगाराची निर्मिती;-
 दुष्काळा निवारण्यासाठी नानांनी तालुकयात  रस्ते बांधणे ,  नाला बांधणे ,जमीन सपाटीकरण,  बांध बंदिस्ती  या सारखे  लोक उपयोगी कामे हाती घेवून ,  रिकाम्या हाताला काम व  भुकेल्या पोटाला भाकरी मिळवून दिली .
धडक मोर्चा ;- १९७२ मध्ये  भीषण दुष्काळात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी   पस्तीस हजार जन समुदायाचा धडक मोर्चा काढला .तेंव्हा  मुख्यमंत्री  स्व;ता नानाच्या भेटीला आले होते .
धरणाची निर्मिती ;- भोजापूर धरणाचे तालुक्यातील शेतीला १०० टक्के पाणी मिळावे ,या साठी मोठे आंदोलन केले. सरदवाडी ,कोनाबे, व कडवा धरणाची  निर्मिती  करून सिन्नर तालुक्याच्या शेतीला हातभार लावला .
मा . पतंप्रधान राजीव गांधी भेटीला ;- नानांनी सिन्नर तालुक्याच्या दुष्काळी परिस्थिती  त्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग याच्या पर्यंत पोहचवली .या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढे स्व:ता, मा . पतंप्रधान राजीव गांधी हे सिन्नरमध्ये पांगरी या गावात  आले होते .
मीटर हटाव  मोहीम ;- शेतीला पाण्याची सुविधा नाही . तर विजपंपाला मिटर कशासाठी हवे ? यासाठी मीटर हाटाव  करण्यासाठी  नानांनी भव्य मोर्चा काढला  .व शासनाला मीटर  बंद करायला भाग  पाडले .
निवडणुकीतील रोमहर्षक  विजय ;
नानांनी पुढे कॉंग्रेस  पक्षात प्रवेश करून १९७८ मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना पक्षाने तिकीट दिले नाही .तेव्हा लोकाग्रास्तव अपक्ष पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला .लोकांनी निवडणुकीचा खर्च वर्गणी काढून  केला .व नानांना निवडून आणले .सिन्नर  तालुक्यातील मुलुख मैदानी तोफ विधान सभेत पोहचली . त्यांची  संसदेत गाजलेली भाषणे स्वतंत्र एक अभ्यासाचा विषय ठरले . १९८०मध्ये दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत तर  राज्यात शरद पवारांच्या नंतर दुसऱ्या क्रमांक ने मताधिक्य  घेऊन नाना निवडून आले ,व राज्यातील मातबर नेत्यांनी नानाचे वर्चस्व स्विकारले .
सहकारी औद्योगिक वसाहत स्थापना ;-
नानाच्या कार्यकाळातील सर्वात महत्वाचे व मोठे काम म्हणजे मुसळगाव वसाहतीतील सहकारी तत्वावरील  औद्योगिक वसाहत  होय .शासकीय  यत्रनेचा  सतत पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद न दिल्याने , तालुक्यातील  जनतेला हाताशी धरून सहकारी तत्वावरील  औद्योगिक वसाहत  उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला .वआशिया खंडातील पहिली  सहकारी तत्वावरील औद्योगिक वसाहत  उभी राहिली .१९८३ साली उन्हातानात उभे राहून ,रात्र दिवस एक करून प्रसंगी हातावर चटणी भाकर खाऊन ,वसाहतीत रस्ते ,पाणी, वीज  दळणवळण यांची सुविधा उपलब्ध करून  देण्यासाठी  प्रयत्न केला .कारखानदाराचे मन वळवून मोठे प्रकल्प सुरु केले .आज मितीला हजारो च्या सख्येनी कामगाराच्या  घराची चूल पेटवण्याची कार्य नानांनी केले .  पुढे याच कार्यातून प्रेरणा घेऊन माळेगाव व सेझ प्रकल्पाची उभारणी झाली .त्यामुळेच तालुक्याचा चेहराच बदलला .  नानाच्या या कार्याची दखल घेउन  मा . शरद पवार याच्या हस्ते गौरव करण्यात आला होता . मा . शरद पवार  मा. रामाराव आदिक , मुख्यमत्री बाबासाहेब भोसले ,मा. वसंतराव नाईक मा. विलासराव देशमुख ,मा. बबनराव पाचपुते  गोविंदराव अधिक अभय सिंह  राजेभोसलेबळीराम हिरे , मा. ए.टी. पवारसाहेब मा.भाऊसाहेब थोरात ;मा.वंसतराव पवार या सर्व नेत्यांनी नानाच्या कार्याची दखल  घेत वेळोवेळी मदतीचा हात दिला .
जलसिंचन प्रकल्प ;-    
 दुष्काळ दूर व्हावा व शेतीला बारमाही पाणी मिळावे यासाठी १] गोदावरी उपसा जलसिंचन प्रकल्प  2 ] सरस्वती  उपसा जलसिंचन प्रकल्प   3] भैरवनाथ  उपसा जलसिंचन प्रकल्प  ,या सारखे    जलसिंचन प्रकल्प  नानानी उभे केले . स्व:ता शरद पवार साहेब यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले .
शैक्षणिक सुधारणा  ;तालुक्यातील गोरगरीबाच्या मुलांना शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून १९६४ मध्ये माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली . ‘जनी ज्ञानदीप लावू जगी  या ब्रीद वाक्यानुसार सर्वसामान्य कुटुबातील मुलांना उच्च दर्जाचे  शिक्षण  मिळावे; यासाठी नानांनी तालुक्यातील ग्रामीण भागात शाळा काढल्या .देवपूर ,पांचाळे, शहा, मुसळगाव , पाथरे येथे विद्यालये सुरु केले . तसेच शहरी भागातील मुलाप्रमाणेच  आपल्या ग्रामीण भागातील मुले कमी पडू नये .म्हणून  उच्च दर्जाचे  शिक्षण  मिळावे यासाठी पहिल्या इग्रजी माध्यमाचे अत्याधुनिक सुविधेचे स्कूल एस .जी .पब्लिक स्कूल सिन्नर या नावाने सिन्नरमध्ये सुरु केले मराठी सेमी ,इग्रजी चे दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य येथे चालू आहे .शिक्षणाची खऱ्या अर्थाने   ‘मृहतमेढ  नानांनी त्या काळात रोवली           
शिक्षण क्षेत्रातील विविध बदल सर्वप्रथम आपल्या संस्थेत राबवल्या जात. इंग्रजी माध्यमाची सुरुवात असो ,सेमी शिक्षण ,संगणक शिक्षण ,किवां मूल्यमापनाचे  फॉर्मेट  असो ,ते सर्वात प्रथम तालुक्यात शाळेत राबवले जात .
डिजिटल तंत्रज्ञान;- आज सगळीकडे  डिजिटल तंत्रज्ञानाची सुरुवात होत असताना , नानांनी आपल्या संस्थेत पाच वर्षापूर्वीच इडोकॉम या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील  कंपनी सोबत करार करुन ,ई –लर्निग ची शिक्षण प्रणालीची सुविधा उपलब्द  करून दिली .बालवाडी पासून ते १२ वी पंर्यतचे विद्याथ्री डिजिटल तंत्रज्ञाना द्वारे ज्ञान अवगत करीत आहे .शाळेतील विद्यार्थी बाहेर पडताना परिपूर्ण क्षमतेने पडत असल्यामुळे देशात, परदेशात उच्च्पदावर कार्यरत आहे . तालुक्याचे ,शाळेचे नाव काढत आहे .,हे बघून नानानां नक्कीच समाधान वाटते .
प्रेरणादायी  कार्य ;- नाना आज नव्वद वर्षाचे झाले ,असून त्यांचे कार्य त्यांचे चिंरजीव यशस्वीपणे सांभाळत आहे .जेमतेम प्राथमिक शिक्षण घेतलेला नानां सारखा माणूस कत्वृत्वाचा एवढा  उंच हिमालय उभा करू शकतो .हा सर्व इतिहास, त्यांचे कार्य आजच्या तरुण वर्गाला ,नेत्यांना निश्चितच प्रेरणादायी  असाच आहे . 
 तालुक्यातील  जनता नानाच्या या कार्याला  पिढ्यान पिढ्या विसरणार नाही .कारण नानांनी तालुक्याच्या विकासाचा भक्कम पाया रचून ,सिन्नरचे नाव इतिहासात तसेच जगाच्या नकाशात झळकावले आहे .
अश्या यां किमायागारास   वाढदिवसा निमित्त लाख लाख मनपूर्वक शुभेच्छा. ||
                     
शब्दांकन ;- श्री चतुर बापू कारभारी  सिन्नर


 


                               

No comments:

Post a Comment