जिज्ञासा प्रश्न व त्यांची उत्तरे
१) झाडाचे आयुष्य कसे मोजतात?:- झाडाच्या सोडाची वाट ही टप्प्या टप्याने होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी एक नवीन भर तयार होतो. सोड काप्ल्यास हे भर काड्यांच्या स्वरुपात दिसतात यावरून झाडाचे आयुष्य ठरवीता येते.
२) पृथ्वीचे आयुष्य किती असु शकते?
:- पृथ्वीचे आयुष्य सूर्याच्या आयुष्या बरोबर जोडले जाते. सूर्याचा आयुष्य काळ हा सुमारे सात अब्ज वर्ष आहे. त्या पुर्वी त्याचा विस्तार वाढून पृथ्वी त्यात सामावली जाईल असे मानले जाते.
३) चंद्रावर गुरूत्वाकर्षण का नाही?
:- चंद्रावर गुरूत्वाकर्षण असते फ्क्त ते पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या एक पंचमश एवढे असते. चंद्रचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमाना पेक्षा कमी असल्याने गुरूत्वाकर्षण कमी असते. आपण पृथ्वीवर जेवढी उंच उडी मारू शकतो त्याच्या जवळपास पाचपट उंच उडी चंद्रावर मारणे शक्य आहे.
४) पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याच्या वेग किती? तो कसा मोजतात?
:- पृथ्वीला स्वत: भोवती एक फेरी मारण्यासाठी तेवीस तास छप्पन्न मिनिटे आणि चार सेकंद (सुमारे चोवीस तास ) लागतात या वेळात ती आपल्या परिघा एवढे म्हणजे चाळीस हजार किलोमीटिर् एवढे अंतर कापते. यावरून फिरण्याचा वेग काढला जातो. दूरच्या तार्याला प्रमाणभूत मानून एक फेरीला लागणारा वेळ ठरवीता येतो .
५) जगातील सर्वात कठीण पदार्थ कोणता?
:- हिरा हा जगातील सर्वात कठीण नैसर्गिक स्वरुपात अस्तित्वात असणारा कठीण पदार्थ आहे. हिरा हे कार्बन या मूळद्रव्याचे रूप आहे . अब्जानशी (नानो) हि-याच्या नलिका पासून बनलेला पदार्थ हि-यापेक्षा ही कठीण मानला जातो.
६) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
:- सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
सहारा या अरेबिक शब्दाचा अर्थ वाळवंट असा आहे. याचा आकार नव्वद लाख चौरस किलोमीटर एवढा असून आफ्रिका खंडात आहे. ईथले सरासरी पर्जन्यमान वीस सेंटिमीटर पेक्षा कमी आहे.
७) वस्तुची घनता म्हणजे काय ?
:- पदार्थाचे वस्तुमान आणि आकारमान यांच्या गुणोत्तराला घनता असे म्हणतात.
स्थायुंची घनता द्रवापेक्षा तर द्रवाची घनता वायुपेक्षा कमी असते. पाण्याचा अपवाद सोडल्यास पदार्थाचे द्रवाचे स्थायुमधे रुपांतर केल्यास घनता वाढते. द्रवाची घनता अतिप्रमाणात वाढल्यास कृष्णविवर तयार होते.
८) शनि या ग्रहाभोवती कडे का असते ?
:- शनि भोवतीची ही कडी एकसंध नसून ती हजारो लहान बनलेली कड्यानी आहेत. ही लहान कडी
बर्फाच्या कणाणि बनलेली आहेत. शनीचे तापमान खूपच कमी आहे. शनिग्रहच्या निर्मितिच्या वेळी ह्या कडच्यांची निर्मिती झाली असावी असे मानले जाते.
९) सूर्य दररोज उगवतो आणि मावळतो असे का?
:- पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना स्वतःभोवतीही फिरते. आपण पृथ्वीवर असल्याने पृथ्वीचे फिरणे आपल्याला जाणवत नाही. सुर्याकडील भाग पुढे जात असताना सूर्य उलट दिशेने जाताना दिसतो. ज्यावेळी एखाद्या भागावर सूर्याची किरणे पोहचणे थांबते त्यावेळी सूर्य मावळताना दिसतो. त्याच भागावर सूर्याची किरणे पडू लागली
की सूर्य उगवताना दिसतो.
१०) उकाडा आणि थंडी कशामुळे जाणवतात?
:- वातावरणाचे तापमान वाढले की त्याचा परिणाम शरीरावर होतो. शरीर थंड ठेवण्यासाठी घाम तयार होतो. यावेळी जी जाणीव होते याला उकाडा म्हणतात. याउलट वातावरण थंड झाल्यास शरीराचे तपमान कमी होते. स्नायू आकुंचन पाऊन हुडहुडी भरते. या जाणीवेला थंडी असे म्हणतात.
११) हिमवर्षाव ठराविक ठिकाणीच का होतो?
:- ढग हे पाण्याच्या वाफेचे बनलेले असतात. थंड वातावरणामुळे वाफेचे पाण्यात रुपांतर होते. हे जलबिंदू खाली येताना जर वातावरण थंड असेल तर त्यांचे बर्फात रुपांतर होते. अशी स्थिती धृव प्रदेशात त्याचप्रमाणे हिमालयासारख्या प्रदेशात असते. त्यामुळे कशा ठराविक प्रदेशातच हिमवर्षाव होतो.
१२) चक्रीवादळे का होतात?
:- हवा तापून वर गेल्याने काही ठिकाणी कमी दाबाचा भाग निर्माण होतो. भोवतालच्या अधिक दाबाकडील हवा तिकडे खेचल्याने ती चक्राकार फिरू लागते. याचा संबंध ढगांशी आणि हवेच्या वरच्या थरांशी आला की त्यातून चक्रीवादळ तयार होते. सूसाट वारे, ढग आणि विजांचा कडकडाट त्यातून निर्माण होतात.
१३) भात शिजवताना कुकरची शिट्टी का व्हावी लागते?
:- पाण्यावर दाब दिल्यास त्याचा उत्कलन बिंदू वाढतो. कुकरमध्ये वाफ कोंडल्यामुळे ही क्रिया घडते. मात्र हा दाब विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर वाढू नये यासाठी वाफ बाहेर टाकण्याची योजना असते. वाफ बाहेर येताना शिट्टीसारख्या आवाज येतो. भात शिजण्यासाठी ही क्रिया दोन ते तीन वेळा व्हावी लागते.
१४) पाऊस पडून गेल्यावर मातीचा वास का येतो?
:- पाऊस पडून गेल्यानंतर मातीचा वास येण्याची तीन मुख्य कारणे आहेत. मातीमधील अॅक्टीनोमसीटस या जीवाणूंचे कोशिका कण हवेमध्ये मिसळून वास येतो. पावसाचे पाणी आम्लधर्मीय असल्यास त्याचा परिणाम मातीमधील रसायनांशी येऊन वायू तयार होऊन वास येतो. वनस्पतींनी बाहेर टाकलेल्या तेलांवर पावसाचा परिणाम होऊन वयुनिर्मिती होऊन वास येतो.
१५) पक्षावर उडताना गुरूत्वाकर्षणाच परिणाम होत नाही का?
:- पक्षांवरही गुरूत्वाकर्षणाचा परिणाम होतो परंतु पंखांच्या सहाय्याने ते पंखाखालच्या हवेचा दाब वाढवतात त्यामुळे त्यांना हवेत उडता येते. अधिक उंचीवर उडणारे घार आणि गरुडासारखे पक्षी हवेतील प्रवाहांचा उपयोग करतात. विमान हवेत उडवताना गुरूत्वाकर्षणावर मात करण्यासाठी अशाच पध्दतीचा उपयोग करतात.
१६) वयोमानानुसार दृष्टि क्षीण का होते?
:- डोळ्यांमधील भिंग अपारदर्शक झाल्यामुळे दृष्टी क्षीण होते. त्याचप्रमाणे नेत्रपटल, क्षीण होते. काळाप्रमाणे अवयव क्षीण होणे ही मानवी शरीराशी निगडीत अंगभूत प्रक्रिया आहे.
१७) आपली ग्रहमाला कशी तयार झाली?
:- वायू, खडक आणि धातू याचं मिश्रण असणार्या आणि चक्राकार गती असणार्या नेब्यूलापासून सूर्याची निर्मिती झाली. त्यातील बाह्य भाग स्वतंत्र होऊन घनीभवन झाले. त्यातून पृथ्वी आणि इतर ग्रह निर्माण झाले. सूर्याच्या गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे ते सूर्याभोवती विशिष्ट कक्षेत फिरू लागले. त्यातून ग्रहमाला निर्माण झाली.
१८) तहान भागविण्यासाठी पाणी कसे उपयोगी पडते?
:- शरीरातील पाण्याची मात्र कमी झाली की तो संदेश मेंदूपर्यंत पोहचतो. त्यातून या कमतरेची जाणीव होते. यालाच तहान लागणे असे म्हणतात. पाणी पिल्यानंतर त्याचे शरिरात शोषण होऊन कमतरता भरून निघते. याची जाणीव आपल्याला होते. यालाच तहान भागणे असे म्हणतात.
१९) पानगळीच्या श्रतूत पानांचा रंग का बदलतो?
:- पानगळीच्या श्रतूमध्ये पाने गळण्याची प्रक्रिया होते. परंतु ही प्रक्रिया होत असताना पानांमधील हरितद्रव्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पानामध्ये पिवळसर कॅरोटीनॉइड आणि नारंगी रंगाच्या झॅंथोफिल द्रव्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे लाल तपकिरी आणि गुलाबी रंगाची द्रव्ये तयार होतात. त्यामुळे पानांचा रंग बदलतो.
२०) हत्ती झोपतात कसे?
:- हत्ती रात्री तीन ते चार तास आडवे होऊन झोपतात. हा काळ साधारणपणे मध्यरात्र ते पहाट असा असतो. दिवसा मात्र ते उभे राहून झोपतात. आजारी हत्ती मात्र रात्रीही उभ्यानेच विश्रांती घेतात. आफ्रिकन आणि आशियातील हत्तीचे त्याचप्रकारचे वर्तन करतात.
२१) बर्फ कसा तयार होतो?
:- बर्फ हे पाण्याचे स्थायू रूप आहे. पाण्याचे तपमान कमी होत गेल्यास पाण्याच्या रेणूंची उर्जा कमी होऊन ते एकत्र येतात. या रेणूंमध्ये बंध तयार होऊन त्यांचे रुपांतर स्फटिांमध्ये आणि त्यानंतर मोठ्या आकाराच्या तुकड्यात होते. ही क्रिया सामान्यतः शुन्य अंश सेल्शियस तपमानाला घडते.
२२) दही कसे तयार होते?
:- दूधापासून दही तयार होण्याची प्रक्रिया ही विशिष्ठ प्रकारच्या जीवाणूंमुळे होते. दही करण्यासाठी कोमट दूधात विरजण घालून ते विशिष्ठ तपमानाला ठेवतात. बॅक्टेरिया आम्लाची निर्मिती करून दूध घट्ट करण्याची प्रक्रिया करतात. यालाच आपण दही असे म्हणतो.
२३) काही व्यक्तींचे डोळे निळे अथव हिरवे का असतात?
:- व्यक्तीच्या डोळ्यांचा रंग हा बुब्बुळांच्या आकाराचे नियत्रंण करणार्या पडद्यामुळे ठरतो. या पडद्याला आयरीस असे म्हणतात. या पडद्यांमध्ये असणार्या रंगद्रव्यांमुळे डोळ्यांना रंग प्राप्त होतो. ज्या व्यक्तींमध्ये निळा रंग न शोषणारे रंगद्रव्य असते त्यांचे डोळे निळे तर ज्या व्यक्तींमध्ये हिरवा रंग न शोषणारे रंगद्रव्य असते त्यांचे डोळे
हिरवे दिसतात. हा गुणधर्म अनुवांशिक आहे.
२४) वनस्पती आपले अन्न कसे मिळवितात?
:- वनस्पती प्रकाश संश्लेषण पध्दतीचा वापर करुन कर्बोदके तयार करतात. यासाठी त्या पाणी, कार्बनडाय ऑक्साईड आणि प्रकाश उर्जेचा वापर करतात. या कार्बोदकांचा उपयोग रासायनिक स्वरूपातील उर्जा मिळविण्यासाठी होतो. मुळाव्दारे त्या खनिजे आणि क्षार मिळवितात. त्यांचा उपयोग करुन त्या जीवनावश्यक जैवरेणूंची
निर्मिती करतात.
२५) धूमकेतू म्हणजे काय?
:- सूर्यमाला तयार होताना जशी ग्रहांची निर्मिती झाली. तशीच काही लहान भूखंड तयार झाले. यापैकी काही लहान भूखंड सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार कक्षांमध्ये फिरतात. या कक्षा खुपच विस्तृत असल्याने त्यांना सूर्याभोवती प्रदक्षीणेसाठी कित्येक दशके लागतात. हे सूर्याजवळ आल्यामुळे प्रकाशीत होतात. त्याचप्रमाणे
त्यांच्यावरील द्रव्यांच्या बाष्पीभवनामुळे शेपटी तयार होते. यांना धूमकेतू म्हणतो.
२६) समुद्राला भरती ओहोटी कशामुळे येते?
:- सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये गुरूत्वाकर्षणाचे बल कार्य करते. चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत येतात त्यावेळी हे बल वाढून पाण्याचा फुगवटा वाढतो. ही स्थिती बदलल्यानंतर पाण्याची पातळी पूर्ववत होते. अमावस्या आणि पौणिमेला हे घडते.
२७) सूर्यमाला सोलर सिस्टीम म्हणजे का?
:- सूर्य आणि त्याभोवती फिरणारे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, नेपचून आणि यूरेनससारखे ग्रह आणि ग्रहांभोवती फिरणारे उपग्रह. त्याचप्रमाणे धूमकेतू, अश्म, धूळ, अॅस्टेरॉईड आणि विदयूतभारीत धूळ यांचाही सूर्यमाले समावेश आहे. प्लुटोही सूर्यमालेचाच भाग आहे.
२८) आपल्या आकाशगंगेचे स्वरूप काय आहे?
:- आपल्या आकाशगंगेत सूर्यमालेबरोबरच इतर अब्जावधी तार्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे धूलीकण आणि वायूंचे प्रचंड ढग यामध्ये आहेत. आकाशगंगेचा आकार हा पातळ तबकडीप्रमाणे असून तिचा मध्यभाग फुगीर आहे. तिचे वर्गीकरण सर्पिल आकाराच्या तारामंडळामध्ये केले जाते.
२९) मोबाईल कॉम्प्यूटर जवळ नेला की आवाज का येतो?
:- मोबाईलचे कार्य हे विद्युतचुंबकीय लहरींच्या सहाय्याने चालते. मोबाईल कडून येणारे ध्वनिसंदेश या लहरींमार्फत येतात. संगणकांची ध्वनिक्षेपक यंत्रणा हे संदेश पकडते. त्यामुळे त्यातून आवाज येतो.
३०) कॅलरी कशा मोजल्या जातात?
:- एखाद्या पदार्थाच्या ज्वलनामधून किती उष्णता मिळते याचे मापन करण्यासाठी कॅलरी हे परिमाण वापरतात. एक ग्रॅम पाण्याचे तपमान एक डिग्री सेटीग्रेडने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे एक कॅलरी अन्नपदार्थापासून मिळणार्या उष्णतेच्या बाबतीत मात्र एक हजार कॅलरींना कॅलरी असे संबोधले जाते.
३१) भूकंप कशामुळे होतात?
:- पृथ्वीचा पृष्ठभाग सलग दिसत असला तरी भूगर्भात जमिनीच्या खंडित भागांची हालचाल होत असते. जेंव्हा हे दोन भाग एकमेकांवर आदळतात त्यावेळी कंपन लहरी निर्माण होतात. यामुळे होणार्या जमिनीच्या कंपनांना भूकंप असे म्हणतात.
३२) आवाजाचा वेग कसा मोजतात?
:- आवाजाच्या स्त्रोतासमोर एक रेषेत दोन ध्वनिग्राहक ठेवतात. या दोन्ही ध्वनिग्राहकामध्ये काही विशिष्ठ अंतर असते. निर्माण केलेला ध्वनि पहिल्या ध्वनिग्राहकाने नोंदविल्यानंतर किती वेळाने दुसरा ध्वनिग्राहक नोंदवितो याचे मापन करतात. या दोन्ही ध्वनिग्राहकामधील अंतर आणि वेळेतील फरक यावरुन ध्वनिचा हवेतील वेग
मोजता येतो.
३३) रेडिओचे कार्य कसे चालते?
:- रेडिओ केंद्रामधून प्रक्षेपित झालेले ध्वनि संदेश विद्युतचुंबकीय लहरी रेडिओपर्यंत पोहचवतात. रेडिओमध्ये हा ध्वनिसंदेश अलग करणारी यंत्रणा असते. हा अलग केलेला ध्वनि संदेश ध्वनिक्षेपकाला पुरवला जातो. अशा प्रकारे हा संदेश आपण ऐकू शकतो.
३४) संगणकामध्ये इतकी माहिती कशी साठवली जाते?
:- संगणकामध्ये माहिती ही शुन्य आणि एक या संकेताचा वापर करुन साठवतात. यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि पध्दतींचा वापर करतात. या पध्दतीमुळे संगणकाची माहिती साठविण्याची क्षमता खूपच जास्त असते.
३५) मोबाइलचे कार्य कसे चालते?
:- मोबाईलचे कार्य विद्युतचुंबकीय लहरींच्या सहाय्याने चालते. यात बिनतारी यंत्रणेचा वापर करतात. मोबाईलमधून जाणारा संदेश जवळच्या स्टेशनमार्फत उपग्रहाचा हवा तसा वापर करुन इच्छित स्थळी पाठवतात. मोबाईलमध्ये संदेश पाठविण्याची त्याचप्रमाणे ग्रहण करण्याची व्यवस्था असते.
३६) बुरशी कशी तयार होते?
:- बुरशी हा एक प्रकारच्या सुक्ष्मजीवांचा समूह असतो. यामध्ये हरितद्रव्य नसते. ते आपले अन्न बाह्यघटकांपासून मिळवितात. दमट हवामान आणि अन्नाची उपलब्धता यामुळे त्यांची वाढ झपाट्याने होते. यांची संख्या वाढल्यानंतर शिळे अन्न झाडे यावर तिचे आस्तित्व डोळ्यांना दिसते.
३७) प्रत्येक झेब्र्याच्या अंगावर सारखेच काळे पांढरे पट्टे का असतात?
:- मोरांच्या पंखावरील रंग, पोपटाची चोच याप्रमाणेच झेब्रा या प्राण्याचे हे वैशिष्टये आहे. हा गुणधर्म अनुवांशिक आहे. या सारखेपणाचा उपयोग सिहांसारख्या शत्रूकडून बचाव करण्यासाठी होतो.
३८) कोंबडा पक्षी असूनही उडू का शकत नाही?
:- पक्षी असे वर्गीकरण केल्या प्राण्यांच्या अंगावर पिसे असतात. यापासून पंख बनतात. मात्र सर्वच पक्षी त्यांच्या सहाय्याने उडू शकतात असे नाही. पंखाचा आकार, बळकटी यावर ते अवलंबून असते. कोंबडा, पेग्विन, शहामृग हे न उडणारे पक्षी आहेत.
३९) कमळाच्या फुलाची पाने पाण्यावर का तरंगतात?
:- कमळाच्या फुलाची पाने झाडावर असतानाप पाण्याच्या वर असतात. कारण त्यांना आधार देणार्या देठाची वाढ पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर काही सेंटीमीटर झालेली असते. त्यामुळे ती पाण्यावर तरंगल्यासारखी दिसतात.
४०) एक्स रे म्हणजे काय?
:- एक्स किरण हे विद्युतचुंबकीय तरंग आहेत. या तरंगाची लांबी निळ्या रंगांच्या तरंगापेक्षा सुमारे चार हजार पटींनी कमी असते. यामधील उर्जा अधिक असल्याने ते शरीराच्या हाडांव्यतिरिक्त इतर भागांमधून आरपार जातात. शरीरातील अवयवांची माहिती मिळविण्यासाठी यांचा उपयोग होतो.
४१) पक्षी इंग्रजी व्ही या अक्षराच्या आकारात का उडतात?
:- यामध्ये पुढच्या टोकाला जो पक्षी असतो. त्याच्या उडण्यामुळे हवेचे विस्थापन होऊन प्रवाह कमकुवत असणारे क्षेत्र निर्माण होते. ते इंग्रजी व्हीच्या आकारासारखे असते. त्यामुळे मागच्या पक्षांना हवेचा विरोध कमी होतो त्यामुळे पक्षी व्ही या आकारात उडतात.
४२) प्रकाशाचा वेग किती असतो? तो कसा मोजतात?
:- प्रकाशाचा वेग प्रतिसेकंद तीन लाख किलोमीटर एवढा असतो. वेग मोजण्यासाठी गुरूच्या चंद्राची ग्रहणे, पृथ्वीची सूर्याभोवती फिरणे, गोलाकार फिरणारे आरसे, लेसर किरण, इंटरफेरोमीटर याचा उपयोग केला गेला आहे. मॅक्सवेलचे समीकरणेआणि इतर पध्दती वापरून हा प्रकशाचा वेग मोजतात.
४३) नखे कापताना दुखत का नाही?
:- नखांच्या पुढील भाग आपण जो कापतो त्यातील पेशी मृत असतात. त्या भागामध्ये रक्तपुरवठा नसतो. विशेष म्हणजे त्या भागात संवदेना वाहक तंतू नसतात. त्यामुळे नखांचा हा भाग कापताना वेदना होत नाहीत.
४४) अणू आणि रेणू म्हणजे काय?
:- मूलद्रव्याच्या सूक्ष्म कणांना अणू असे म्हणतात. दोन अथवा अधिक अणूंच्या समूहाला रेणू म्हणतात. परंतु आता अणू हा त्याहूनही सुक्ष्म कणांचा म्हणजे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांचा बनलेला आहे हे माहित झाले आहे.
४५) बांडगुळ कसे असते? ते कोणत्या झाडांवर वाढते?
:- व्यापक अर्थाने विचार केल्यास बांडगुळ या सदरात अनेक प्राणी आणि वनस्पतींचा समावेश होतो. हे प्राणी आणि वनस्पती इतर प्राणी आणि वनस्पतींकडून अन्न मिळवितात. झाडांवर वाढणारी बांडगुळे ही त्यांच्यापेक्षा आकाराने मोठ्या असणार्या झाडांवर वाढतात.
४६) फटाके आकाशात कसे उडतात?
:- फटाक्यामध्ये असणार्या स्फोटक मिश्रणाचे जलद विघटन होते. त्यातून तयार होणार्या वायूंच्या दाबामुळे फटाके आकाशात उडतात. लांब फटाक्यांच्या अथवा बाणांच्या मागील बाजूकडून हे गरम मिश्रण वेगाने बाहेर पडल्यास क्रिया आणि प्रतिक्रियेच्या नियमानुसार फटाके हवेत उडतात.
४७) घोडे उभे राहून झोपतात का? कशामुळे?
:- घोड्यांचे पाय खूपच मजबूत असतात. त्यामुळे त्यांना तीन पायांवर शरिराचा भार तोलून चवथ्या पायाला विश्रांती देता येते. घोडे डोळे उघडे ठेऊन डुलकी काढतात. त्याचप्रमाणे उभे राहून झोपू शकतात.
४८) मृत सागर डेडसी म्हणजे काय?
:- इस्त्रायल आणि जॉर्डनच्या जवळ खार्या पाण्याचा साठा आहे. हे पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा नऊ पट खारट आहे. त्यामुळे या पाण्यात फक्त काही प्रकारचे मासे आणि थोड्याच वनस्पती आढळतात. यामध्ये असणार्या सजीवांचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्याला मृत समुद्र असे म्हणतात.
४९) धूळ कशामुळे तयार होते?
:- पृथ्वीच्या पृष्ठभागाची उन, पाऊस, वारा आणि सजीवांच्या वापरामुळे झीज होते. ही प्रक्रिया सुरूच राहिल्यास दगड आणि माती यांचे सुक्ष्म कणांमध्ये रुपांतर होते. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात हे कण हवेत मिसळतात अथवा पृष्ठभागांवर साचतात यालाच धूळ असे म्हणतात.
५०) पारा हातात पकडता का येत नाही?
:- पारा हा द्रवस्थितीतील धातू आहे. याची घनता अधिक असून पृष्टीय ताण सरफेस टेन्शन अधिक असल्याने त्योच पृष्ठीय रेणू एकमेकांना घट्ट पकडतात. त्यामुळे पार्याला गुळगुळीतपणा येतो व तो हातात सहजपणे पकडता येत नाही.
५१) शरीरातील पांढर्या पेशींचे कार्य काय?
:- रक्तात प्रवेश करणारे अनोळखी पदार्थ त्याचप्रमाणे सुक्ष्मजीव यांचा नाश करून त्यांच्यापासून शरीराचे संरक्षण करणे हे पांढर्या पेशींचे कार्य आहे. काही पांढर्या पेशी अनोळखी पदार्थ गिळंकृत करुन त्यांचा नाश करतात तर काही पेशी त्यांना नष्ट करणारे घटक अँटीबॉडी तयार करतात.
५२) वाळवंट कशी तयार होतात?
:- पावसाचे प्रमाण कमी असणार्या प्रदेशात वाळवंटे तयार होतात. आसे कमी पावसाचे प्रदेश पर्वतामुळे त्याचप्रमाणे गरम हवेमुळे बाष्पाचे शोषण झाल्यामुळे निर्माण होतात. जंगलतोडीमुळे त्याचप्रमाणे जमीनीचे प्रकारही वाळवंटे निर्माण होण्यास हातभार लावतात.
५३) डायनॉसोर नामशेष का झाले?
:- डॉयनॉसोर नष्ट होण्याची जी कारणे दिली जातात. त्यात पृथ्वीचे तपमान कमी होणे हे एक आहे. अवकाशात झालेल्या स्फोटातून निर्माण झालेली किरणोत्सर्जन हे दुसरे कारण मानले जाते. याशिवाय उल्कापात आणि खाण्यासाठी अयोग्य वनस्पतींची निर्मिती ही कारणेही आहेत. परंतु यातील कोणतेही एकच कारण संयुक्तीक मानले
जात नाहीत.
५४) मीठ पाण्यात का विरघळते?
:- मीठ हे सोडियम आणि क्लोरिन यांचरूा संयोगातून बनलेले असते. पाण्यात मीठाच्या रेणूंचे सोडियम आणि क्लोरिन यांच्या धनभारीत आणि श्रणभरीत आयांनमध्ये रूपांतर होते. हे आयान आकारने लहान असल्याने पाण्यांच्या रेणूमधील जागेत समावून जातात. याला विरघळणे असे म्हणतात.
५५) बाष्पीभवन कसे होते?
:- द्रवाच्या पृष्ठभागावरील रेणू वातावरणातील उष्णता शोषूण घेतात. त्यामुळे त्यांना गती प्राप्त होऊन ते पृष्ठभागापासून अलग होतात. हे रेणू हलके असल्यामुळे हवेत वर जातात. यालाच बाष्पीभवन म्हणतात.
५६) पृथ्वी गोलाकार आहे का?
:- पृथ्वी पूर्ण गोलाकार नाही. विषववृत्तावर तिच्या केन्द्रबिंदूपासूनचे अंतर गोलार्धावर असणार्या अंतरापेक्षा अधिक आहे.
५७) जगजवळ येत आहे म्हणजे काय?
:- विमान आणि इतर दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने परस्परांशी प्रत्यक्ष संपर्क सहजपणे होऊ शकतो. त्याप्रमाणे मोबाईल आणि दूरध्वनि, इंटरनेट यासारख्या साधनांमुळे आवाज, चित्र आणि माहितीव्दारेही जगात कुठेही आणि केव्हाही संपर्क होऊ शकतो. जग जवळ येण्याची ही एक कल्पना आहे.
५८) लोखंडाच्या वस्तु का गंजतात ?
:- दमट हवेमध्ये अथवा पाण्याच्या सानिध्यात लोखंडाचा ऑक्सीजनशी संयोग ह.
४२) प्रकाशाचा वेग किती असतो? तो कसा मोजतात?
:- प्रकाशाचा वेग प्रतिसेकंद तीन लाख किलोमीटर एवढा असतो. वेग मोजण्यासाठी गुरूच्या चंद्राची ग्रहणे, पृथ्वीची सूर्याभोवती फिरणे, गोलाकार फिरणारे आरसे, लेसर किरण, इंटरफेरोमीटर याचा उपयोग केला गेला आहे. मॅक्सवेलचे समीकरणे आणि इतर पध्दती वापरून हा प्रकशाचा वेग मोजतात.

:- दमट हवेमध्ये अथवा पाण्याच्या सानिध्यात लोखंडाचा ऑक्सीजनशी संयोग होऊन त्याचे भस्म तयार होते. यात पाण्याच्या रेणूंचाही समावेश असतो. यालाच गंज असे म्हणतात. यामुळे लोखंडाच्या वस्तूंची झीज होऊन त्या कमकुवत बनतात.
५९) रातांधळेपणा म्हणजे काय?
:- कमी प्रकाशात न दिसण्याच्या स्थितीस रातआंधळेपणा असे म्हणतात. भरपूर उजेडात याच व्यक्तीची पाहण्याची क्षमता सामान्य असते. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो.
६०) कुपोषण कशामुळे होते?
:- शरिराला आवश्यक असणारे कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि धातू यासारखे पदार्थ पूरेशा प्रमाणात मिळाले नाहीत तर कुपोषण होते. हे प्राथमिक स्वरुपाचे कुपोषण होय. याशिवाय अन्न घटकाचे शोषण आणि पचन योग्यप्रकारे न झाल्यामुळेही कुपोषण होते.
६१) उन्हात गेल्यावर चक्कर का येते?
:- उन्हात फिरल्यामुळे शरिरातील पाणी आणि क्षाराचे प्रमाण कमी होते. शरिराचे तापमान कमी होऊन चक्कर येते. हा तुलनेने कमी असा उष्माघाताचा प्रकार आहे. घाम येणे बंद होऊन शरीराचे तापमान वाढल्यास व्यक्ती कोमात जाऊन मृत्यू येण्याची शक्यता असते.
६२) पापण्यांची उघडझाप का होते?
:- डोळा हा अतिशय सक्षम परंतु तितकाच नाजूक अवयव आहे. तीव्र प्रकाश, धूलीकण, लहान आघात यापासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी पापण्यांची योजना असते. पापण्यांच्या सतत होणार्या हालचालींमुळे ग्रंथीमधून बाहेर येणारा द्रव सर्वत्र पसरून डोळे ओलसर राहण्यास मदत होते.
६३) डोळे रंग कसे ओळखतात?
:- डोळ्यामध्ये दृष्टीपटल असते. यामधील शंक्वाकृती पेशींमध्ये तीन प्रकारची रंगद्रव्ये असतात. ही रंगद्रव्ये निळा, हिरवा आणि लाल रंगाच्या प्रकाशाचे शोषण करतात. ही माहिती मेंदूपर्यंत पोहचवली जाते. त्यातून आपल्याला रंग ओळखता येतात.
६४) भूकेची जाणीव कशी होते?
:- खालेल्या अन्नाचे जठर आणि लहान आतड्यात पचन होऊन अन्नद्रव्ये रक्तात शोषली जातात. शरीराला उर्जा पुरविणारी शर्करा ग्लुकोज सर्व पेशींना पुरवली जाते. ग्लुकोजची रक्तातील मात्रा कमी झाल्यास मेंदूला त्याची माहिती मिळते त्यातून भूकेची जाणीव निर्माण होते.
६५) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
:- सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. साहरा या अरेबिक शब्दाचा अर्थ वाळवंट असा आहे. याचा आकार नव्वद लाख चौरस किलोमीटर एवढा असून ते उत्तर आफ्रिका खंडात आहे. इथले सरासरी पर्जन्यमान वीस सेंटीमीटर पेक्षा कमी आहे.
६६) वस्तुची घनता म्हणजे काय?
:- पदार्थाचे वस्तुमान आणि आकारमान यांच्या गुणोत्तराला घनता असे म्हणतात. स्थायूंची घनता द्रवापेक्षा तर द्रवाची घनता वायूपेक्षा कमी असते. पाण्याचा अपवाद सोडल्यास पदार्थाचे द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर केल्यास घनता वाढते. द्रव्याची घनता अतिप्रमाणात वाढल्यास कृष्णविवर तयार होते.
६७) उचकी का लागते?
:- पोटाच्या वरच्या बाजूला असलेल्या पडद्याचा दाट झाल्यामुळे तो खाली ओढला जातो. त्यामुळे हवा श्वासनलिकेत खचली जाते. त्यामुळे जो आवाज येतो त्याला उचकी असे म्हणतात.
*रक्ताचा रंग लालच का असतो ? जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी*
आरोग्यानामा ऑनलाइन – मानवी रक्ताचा रंग लालच का असतो ? रक्तामध्ये किती घटक असतात? जखमेतून येणारे रक्त काही वेळाने आपोआप बंद कसे होते? शरीरात एकुण किती लिटर रक्त असते? असे विविध प्रश्न अनेकांना पडतात. याच प्रश्नांची उत्तरे आणि रक्तासंबंधी आणखी रंजक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
१ मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर म्हणजेच १.३ गॅलन रक्त असते. रक्त एक गुंतागुंतीची रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे.
२ रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या लाल पेशींमध्ये लाल रंगाचे हिमोग्लोबिन असल्याने रक्त लाल दिसते.
३ हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईड रक्तामध्ये विरघळते. यामुळे त्यांचे वहन सुलभ होते. रक्तामध्ये लाल रंगाच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण तब्बल ९७ टक्के असते.
४ रक्तातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे सफेद रक्तपेशी होय. या रक्तपेशी शरीराचे विविध आजारापासून रक्षण करतात.
५ रक्तातील आणखी एक महत्वाच घटक म्हणजे बिंबिका होय. बिंबिकांचे महत्वाचे कार्य रक्त गोठवणे हे असते. जखम झाल्यास तेथे बिंबिका जमा होतात आणि रक्त गोठल्याने ते बाहेर येणे थांबते. त्यांचा आकार दोन ते तीन मायक्रोमीटर असतो.

No comments:
Post a Comment