जनरल माहिती

                                   * * जनरल माहिती**

  !! व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची                                 क्षेत्रफळाची रुपांतरे   !!

▪ १ हेक्टर = १०००० चौ. मी .
▪ १ एकर = ४० गुंठे
▪ १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
▪ १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
▪ १ आर = १ गुंठा
▪ १ हेक्टर = १०० आर
▪ १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
▪ १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

🌎 *!! धरणांची पाणी

*धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???*

1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??
2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??
3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??

सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.

इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???

आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.

पाणी मोजण्याची एकके

*स्थिर पाणी मोजण्याची एकके* –
1) लिटर
2) घनफूट
3) घनमीटर
4) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)

एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.

1 टीएमसी  = 28,316,846,592 लिटर्स

*वाहते पाणी मोजण्याची एकके*-

1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.

2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते.

*उदा*.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.
म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.

याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.
म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

*महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 05 धरणे*

1)उजनी 117.27 टीएमसी
2)कोयना 105.27 टीएमसी
3)जायकवाडी 76.65 टीएमसी  ( पैठण )
4)पेंच तोतलाडोह 35.90 टीएमसी
5) पूर्णा येलदरी 28.56 टीएमसी

            * जनरल माहिती *

🌎 *!! २६×३० फुट म्हणजे किती चौरस फुट ? !!* 🌎
१ चौरस फूट म्हणजे समजा आपल्याकडे एक चौरस आकाराचा ठोकळा आहे ज्याचे चारही बाजु सारख्या अंतराचे आहेत म्हणजे १ - १ फूटचे आहेत. किंवा समोरासमोरील बाजु सारख्या आहेत. तर त्याचे ऐकूण क्षेत्रफळ १ चौरस फूट असं..

चौरस फूट जागा मोजतांना वापरतात त्यात ती जागा एकतर पुर्णताः चौकोनी(चारही बाजु सारख्या) किंवा आयताकृती असते.
*चौरस फूटचे एकक sq. ft. किंवा (ft.)^२ असते.*
*ते लांबी गुणीले रुंदीने काढतात.*

जर मी म्हटले आमचं घर ४० बाय ५० चे आहे त्याचा अर्थ होतो जागेची लांबी ४० फूट आणि रुंदी ५० फूट आहे.
मग जागेचं क्षेत्रफळ (४० फूट * ५० फूट ) होईल.
४० फूट * ५० फूट = २०० (फूट)^२ = २०० sq.ft. = २०० चौरस फूट

*२६×३० फुट म्हणजे ->*
(२६ * ३०) फूट..
२६ फूट * ३० फूट..
७८० (फूट)^२ = 780 sq.ft. = 780 (ft)^2..
७८० चौरस फूट किंवा 780 स्क्वेअर फीट.


🌎 *!! जमीन कशी मोजावी, जमीन मोजणीचे सूत्र काय ? !!* 🌎

*गुगल मॅप'* या संकेतस्थळाचा वापर करून आपल्याला शेताचे अथवा प्लॉटचे क्षेत्रफळ मोजता येणे शक्‍य आहे. यात जमिनीचे क्षेत्रफळ वर्ग मीटर अथवा एकरमध्ये मिळते. याद्वारे कमीत कमी २५० चौ.फूट क्षेत्रफळ अचूक मोजता येते. गुगल मॅप हे संकेतस्थळ सर्वांना परिचित आहे. यामध्ये दिसणारी गावे, रस्ते, नदी, नाले व ओळखीचा परिसर अनेकांनी बघितला असेल. संकेतस्थळाद्वारे कमी वेळेत शेताचे अथवा प्लॉटचे क्षेत्रफळ मोजता येते, त्यामुळे हे संकेतस्थळ जमीन मोजणीसाठी अतिशय फायदेशीर आहे.

www.google.com वर *"गुगल मॅप एरिया कॅल्क्‍युलेटर टूल'* असे ऑपरेट करावे. त्यात क्विक फाइंड अशी चौकट दिसेल, त्यात आपल्या देशाचे व शहर/गावाचे नाव टाकावे. शेजारी मॅप अशी एक चौकट दिसते. त्यावर क्‍लिक करून सॅटेलाइट ऑप्शन सिलेक्‍ट करावे. डाव्या हाताला असलेल्या बारवरून इमेज जवळ नेऊन आपल्या जमिनीचे क्षेत्र शोधावे. त्यावर छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे जमिनीच्या क्षेत्राच्या मध्यभागी क्‍लिक करावे. त्यानंतर जितके क्षेत्र असेल त्याच्या चारही टोकांना अशाप्रकारे क्‍लिक करताच हिरव्या रंगाने हे क्षेत्र झाकले जाईल. त्याच्याबरोबर खालील बाजूस आऊटपूट अशी चौकट असते, त्यात आपल्या जमिनीच्या क्षेत्रफळाचे मोजमाप दिलेले असेल.


🌎 *!! 1 ब्रास म्हणजे किती ? !!*


ब्रास हे एकक बांधकाम करतांना वापरले जाते. ब्रास गणितीय पद्धातीने मांडतात. जसे एक डझन म्हणजे १२ तसे एक ब्रास म्हणजे १०० होय.
ब्रास मुख्यत्वे करुन जागेचे क्षेत्रफळ(Sq.ft.) आणि जागेचे घनफळ (CFt.) मध्ये मोजतात.
sq.ft. म्हणजे स्क्वेअर फूट आणि CFt. क्युबिक फूट होय.

*उदाहरणार्थ :*
समजा आपला स्ल्याब(छत) ची जागा आहे ४० बाय ३० ची म्हणजे ४० फूट लांबीत आणि ३० रुंदी. तर त्या जागेचे क्षेत्रफळ होईल ( ४० फूट * ३० फूट ) = १२०० Sq.ft ना...
मग १२००/१०० = १२ ब्रास झाले कारण १०० ब्रास म्हणजे १ ना.. म्हणजे आपण सांगु स्ल्याबचे क्षेत्रफळ १२ ब्रास झाले.

*उदाहरणार्थ :*
समजा एक ट्रक आहे जी ५० बाय २० असुन तिच्या ट्रोलीची खोलता(डेप्थ, Depth) ३ फुट आहे तर त्या ट्रोलीचे घनफळ झाले ( ५० फूट * २० फूट * ३ फूट ) = ३०० क्युबिक फूट CFt.
३०० / १०० = ३ ब्रास.. मग आपण सांगु त्या ट्रालीत एकदम काठोकाठ ३०० क्युबिक फूट किंवा ३ ब्रास वाळु माती मावेल.

*टीप :*
ब्रास फक्त आणि फक्त Sq.Ft. किंवा CFt. वरच मोजतात. जर आपले एकक स्क्वेअर मीटर आहे तर सरळ त्याला १०० ने भागायच नाही. अगोदर Sq.M च Sq. Ft. मध्ये रुपांतर करावे आणि मग १०० ने भागावे

2 comments:

  1. 30ब्रास कांक्रीटला खडी किती व वाळू किती लागते?

    ReplyDelete