*जर तुम्हाला वाटत असेल की ठराविक ग्रूप मध्ये तुम्ही ओपन करून बघितलेले video किंवा image तुमच्या galary मध्ये save होऊ नये....आणि दिसू ही नये..... फक्त ग्रूप ओपन करून बघितल्यास ग्रूप मध्येच दिसावे.... तर खालील स्टेप कराव्यात....*
*ज्या ग्रूप चा media save होऊ नये तो व्हाट्सअप्प Group ओपन करावा. ओपन केल्यानंतर वरील उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्स वर क्लिक करा. आता 'Group Info' या प्रथम दिसणाऱ्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर Media Visibility या पर्यायावर क्लिक करून No असा पर्याय सेट केल्यास मीडिया फाईल्स (इमेज व व्हिडीओ) व्हाट्सएप ग्रुपमध्ये दिसतील परंतु या मीडिया (इमेज व व्हिडिओ) तुमच्या मोबाईल हॅन्ड सेटच्या गॅलरी मध्ये अजिबात साठत नाहीत. तरी मोबाईल हॅन्ड सेट मध्ये असणाऱ्या सर्व व्हाट्सएप ग्रुपला असे सेटिंग्ज आपणास सेट करून ठेवता येईल.
*वाचनकट्ट्यात सहभाग*
ध्वनीमुद्रण कसे करावे?
*ध्वनिमुद्रणासाठी लागणारे साहित्य*
*१. चांगला भ्र. ध्वनी संच.*
*२. वायरवाले हेडफोन+माईक*-(आपण भ्र. ध्वनी विकत घेतो तेव्हा सोबत मिळणारे हेडफोन)
*३. आत्मविश्वासपूर्ण, खणखणीत आवाज*
*४. ध्वनीमुद्रणाकरता योग्य Android App*
_*नाव - Voice recorder*_
_*इथून डाऊनलोड करा*_ - https://goo.gl/XF5g3U
_________________________
*कृती -*
१. सर्व प्रथम भ्र.ध्वनी संचाचा आवाज एकदम बारीक करा - ०
२. भ्र.ध्वनी संच फ्लाईट मोडला ठेवा, म्हणजे इतर आवाज येणार नाहीत तसेच मध्येच कुणाचा फोन येणार नाही.घरातील पंखा ही बंद असावा.
३. Voice recorder - ऍप उघडा
४. हेडफोन कानाला लावा, आणि माईक तोंडापासून ३-४ इंच अंतरावर, तोंडाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवा. एका हाताने पुस्तक/लेख समोर धरा.
५. Voice recorder ऍप मध्ये बरोबर मधोमध, एका पट्टीवर तुम्हाला डाव्या बाजूला रेकॉर्डिंगसाठी-ध्वनिमुद्रणासाठी, लाल ठिपका दिसेल, त्या ठिपक्याला बोट लावल्यावर ध्वनीमुद्रण सुरु होईल. तुम्ही तुमचे वाचन पूर्ण करा आणि वाचन झाल्यावर पुन्हा लाल ठिपक्याला स्पर्श करा म्हणजे ध्वनिमुद्रण थांबेल.
७. ऍप च्या सेटिंग मधून फाईल आम्हाला share करा.
*काय आणि किती वाचावे?*
१.तुम्ही वाचनकट्ट्यामध्ये, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा एखादा अंश/मासिकातले लेख/वर्तमानपत्रातले लेख/अहवाल इ. वाचू शकता. वाचन साधारण ५-७ मिनिटाचे असावे.
३.नंतर *लेखक,पुस्तकाचे आणि लेखाचे नाव* सांगण्यास विसरू नका.
🎯 *अशाप्रकारे करा शाॅर्ट यूआरएल (URL)*
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञान म्हटले की इंटरनेट आवश्यक आहे. जगात कुठेही इंटरनेटशिवाय आजकाल कोणतेही काम होणे शक्य नाही. अनेक कंपन्या, बँक, महाविद्यालये, दवाखाने, सरकारी कार्यालये, वृत्तपत्रे यांच्या वेबसाईट असतात. या वेबसाईट संबंंधित लोक आपल्या गरजेनुसार कामानिमित्त त्या वेबसाईटला भेट देत असतात. या वेबसाईटवरील ठरावीक पेजवरील माहिती आपण लिंक किंवा यूआरल व्दारे शेअर करतो. त्यामुळे या लिंकस किंवा यूआरल या वेबसाईटकरिता महत्वाच्या असतात.
*यूआरएल म्हणजे काय ?*
एखादी वेबसाइट सुरुवातीपासून न पाहता आपणास एक मोठी लिंक पाठविली जाते तर त्या लिंकला लिंक ऐवजी युआरएल (url) असे म्हणतात. युआरएल (url) चे पूर्ण नाव Uniform Resource Locator म्हणजेच एखाद्या पानाचा विशिष्ट स्त्रोत. युआरएल (url) ही प्रामुख्याने एखाद्या वेबसाइटच्या एका विशिष्ट पानावर जाण्याचा प्रत्यक्ष मार्ग होय.
उदा. वृत्तपत्राची साईट आहे. त्याठिकाणी महत्वाची बातमी असते. मग ती बातमी एखादा व्यक्ती यूआरल म्हणजे बातमीची लिंक सोशल मीडियावर शेअर करतो. अनेकवेळा या यूआरएल इतक्या मोठ्या असतात कि पाहूनच काही जण त्या अोपन करत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी ती महत्वाच्या बातमीची लिंक पाठवूनही उपयोग होत नाही. त्यासाठी अनेकवेळा मोठ्या यूआरएल या शाॅर्ट करून पाठवल्या जातात.
पण अनेक जणांना यूआरल शाॅर्ट कशा करायचे हेच माहित नसते. अशाच काही आॅनलाईन वेबसाईट आहेत त्या वापरून आपण यूआरएल शाॅर्ट करू शकतो. बिटली यूआरएल शाॅर्टनर, गूगल यूआरएल शाॅर्टनर, टिनीयूआरएल शाॅर्टनर ही त्यापैकी काही अॅप्सची नावे आहेत.
*गूगल यूआरएल शाॅर्टनर*
1. सर्वप्रथम ब्राउजर मध्ये गूगल यूआरएल शाॅर्टनर टाईप करा त्यानंतर यूआरएल शाॅर्टनरची विंन्डो येईल.
2. या विंन्डोवर ‘यूअर अोरिजिनल यूआरएल’ या टेक्सट बाॅक्स मध्ये तुमची मोठी यूआरएल म्हणजेच तुम्हाला जी हवी ती यूआरएल टाका.
3. त्यानंतर ‘शाॅर्टनर यूआरएल’ या पर्यायावर क्लिक करा.
4. त्यांनतर एक विन्डों अोपन होईल तिथे तुमची अोरिजिनल मोठी यूआरएल ही शाॅर्ट झालेली दिसेल.
5. ‘काॅपी शाॅर्ट यूआरएल’ या आॅयकाॅन वर क्लिक करून शाॅर्ट यूअारएल काॅपी करून ती तुम्ही इतरांशी शेअर करू शकता.
‘गूगल यूआरएल शाॅर्टनर’ ही गूगलची आॅफिशिअल यूआरएल शाॅर्टनर आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही कोणतीही यूआरएल शाॅर्ट करू शकता. यामध्ये तुम्ही प्रत्येक दिवसाचा, आठवड्याचा आणि महिन्याचा डेटा सुध्दा पाहू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे लिंक शाॅर्ट करताना तुमचं जीमेल अकाउंट हे लाॅगइन केलेलं असलं पाहिजे. त्याशिवाय ‘गूगल यूआरएल शाॅर्टनर’ ची विंन्डो तुम्हाला प्राप्त होणार नाह📱
*आपल्याकडून एखादी पोस्ट , चित्र इत्यादी चुकून ग्रुप वर पाठवले गेले असेल तर ?*
*काय कराल ?*
गडबडून जाऊ नका
व्हाट्सएपच्या आता वापरात असलेल्या व्हर्जन मध्ये *डिलीट फॉर एव्हरी वन* नावाची सुविधा उपलब्ध आहे.
*कशी वापराल ही सुविधा ?*
१)जी पोस्ट , फोटो, माहिती तुमच्याकडून चुकून शेअर झाली आहे तिच्यावर बोट ठेवा ..
पोस्ट सिलेक्ट होईल
२) मोबाईलच्या स्क्रीनवर वरच्या बाजूला डिलिट चा आयकॉन येईल
३) त्याला स्पर्श करा येणाऱ्या पर्यायांपैकी शेवटचा म्हणजे *Delete for Everyone*
या पर्यायाला स्पर्श करा
तुमच्या कडून चुकून पाठवला गेलेला मेसेज, पोस्ट, चित्र, मजकूर सर्वांसाठी दिसेनासा झालेला असेल ..
*पण*
ज्याने पोस्ट शेअर केली त्याच्यासाठीच ही सुविधा उपलब्ध आहे.
ही सुविधा फक्त एक तासासाठी उपलब्ध आहे.
💠⚜
पॅटर्न लॉक विसरलात तर?
स्मार्टफोनमध्ये जे काही बिल्टइन सिक्युरिटी फिचर असतात त्यातले सगळ्यात जास्त वापरले जाणारे सिक्युरिटी फिचर म्हणजे पॅटर्न लॉक ! स्मार्टफोन सिक्युरिटीमधला सगळ्यात वरचा लेअर म्हणजे हा ‘पॅटर्न लॉक ’. स्मार्टफोन विकत घेतला रे घेतला की, सगळ्यात आधी लोक हा पॅटर्न लॉक सेट करतात, तो सतत बदलतात. इतरांपेक्षा आपला लॉक वेगळा असावा, म्हणून धडपडतात. पॅटर्न लॉक बदलत राहणं हा अनेकांचा छंदच होऊन बसलेला असतो. हे गाडं तिथवर सुरळीत राहतं, जोवर तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा देत नाही. पण ती कधीतरी दगा देतेच. आणि मग या नात्यामध्ये दरार पडते. स्वत:च सेट केलेले पॅटर्न काहीजण विसरून जातात मग होते खरी पंचाईत. कारण पॅटर्न लॉक विसरलं तर स्मार्टफोन कसं वापरणार? ते लॉक ‘अनलॉक’ करावं लागतं आणि जिथं ऐनवेळेस आपला नेहमीचा पॅटर्न आठवत नाही, तिथं अनलॉक करायचं कसं आठवावं? पण ते माहिती तर पाहिजे, नाहीतर पॅटर्न लॉक उघडता येत नाही, म्हणून रडत बसायची पाळी येते. तशी तुमच्यावर येऊ नये, म्हणून या काही सोप्या आयडिया लक्षात ठेवा..
पॅटर्न लॉक अनलॉक कसं करतात ?पद्धत -1 गुगलचं युजरनेम पासवर्ड जर तुम्ही तुमचा पॅटर्न लॉक विसरलात तर ते अनलॉक करण्याची ही एक सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. तुम्ही पाचवेळा प्रयत्न करुनही अनलॉक होत नसेल तर खाली फरगॉट पॅटर्न हा एक ऑप्शन असतो तो पहा. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला गुगल अकाऊंचं युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो. आजकाल जवळपास नव्वद टक्के स्मार्टफोन धारकांकडे गुगल अकऊंटचं युजर नेम आणि पासवर्ड म्हणजेच गुगलचं अकाऊंट असतंच. त्यामुळे हे गुगलअकऊंटचं युजर नेम आणि पासवर्ड टाकला की काम झालं. त्यानंतर मुळ स्वरुपात म्हणजेच स्क्रिन ओपन होतो. नंतर तुम्ही पुन्हा पॅटर्न बदलवून नवीन लॉक लावू शकता. पद्धत -2 जर तुमच्याकडे गूगल अकाउंटचं यूझर नेम आणि पासवर्ड नसेल किंवा तो पासवर्ड फोन घेत नसेल किंवा तुम्ही गूगलचाही पासवर्ड विसरला असाल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याठिकाणी इंटरनेटची रेंजच नसेल तर काय? कारण तसं झालं तर गूगलचं यूझर नेम आणि पासवर्ड व्हेरिफाय होतच नाही. त्यामुळे तुम्ही पॅटर्न अनलॉक करू शकत नाही. त्यावेळी दुसरी एक पद्धत वापरता येते. त्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन ऑफ करावा लागेल त्यानंतर स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू करावा लागेल. स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू करण्याच्या पद्धती प्रत्येक हॅण्डसेटच्या वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, कॉमन पद्धत म्हणजे पॉवर बटन प्लस व्हॉलूम डाउन हे बटन प्रेस केलं की बरेच स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू होतात. एकदा का तुमचा स्मार्टफोन रिकव्हरी मोडमध्ये चालू झाला की,त्यामध्ये बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्यापैकीच एक म्हणजे फॅक्टरी रिसेट. तसं रिसेट करा. पण लक्षात ठेवा, हे असं करताना तुमचा सगळा डेटा जातो. त्यामुळे आधी फोनचा बॅकअप घ्या. म्हणजेच फोटो किंवा म्युङिाक फाइल्स किंवा आणखी काही डेटा फाइल्स असतील तर त्याचाही बॅकअप घ्या. स्मार्टफोनचा बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन कॉम्प्युटरच्या यूएसबी पोर्टला जोडावा लागेल.त्यानंतर माय कॉम्प्युटरमध्ये जाऊन तुमच्या डिटेक्ट झालेल्या स्मार्टफोन ड्राइव्हमधून तुमचा डेटा कॉपी करून घ्या.
स्मार्टफोन रिसेट करण्यापूर्वी स्मार्टफोनमधील एसडी कार्ड (मेमरी कार्ड) सेफ्टीसाठी म्हणून काढून घ्या. त्यानंतरच स्मार्टफोन रिसेट करा. म्हणजे स्मार्टफोन एसडी कार्ड (मेमरी कार्ड) वरील डेटा सेफ राहील.
स्मार्टफोन रिसेट होऊन पॅटर्न लॉक निघून जाईल आणि तुमचा स्मार्टफोन परत मूळ रुपात येईल. फक्त हे सारं करताना डोकं शांत ठेवा, तरच डाटा वाचेल! पॅटर्न लॉक सेट कसं करतात? फोनच्या मेन्यूमधून सिस्टिम सेटिंगमध्ये जा. तिथं ‘पर्सनल’मध्ये एक सिक्युरिटी हे ऑप्शन असतं. त्यावर क्लिक केल्यानंतर स्क्रिन सिक्युरिटी हे ऑप्शन दिसेल. त्याखाली स्क्रिनलॉक वर क्लिक केलं की, आतमध्ये सात वेगवेगळे स्क्रिन लॉक ऑप्शन दिसतात. नन, स्लाइड, फेस अनलॉक, व्हॉइस अनलॉक, पॅटर्न, पिन आणि शेवटचं म्हणजे पासवर्ड. पॅटर्नवर क्लिक केलं की, ‘चूझ यूवर पॅटर्न’ असा पर्याय येतो. त्यातून एक पॅटर्न निवडून ते तुम्ही कन्फर्म केलं की, झालं तुमचे पॅटर्न लॉक सेट. !!
.
चला तंत्रस्नेही बनूया !!
*स्वताचे वीडियो you tube वर अपलोड करुन link कशी तयार करावी*
7⃣7⃣7⃣7⃣7⃣7⃣7⃣7⃣
*आपले ई मेल अंकाऊट साइन असावे*
1⃣वेब ब्राऊजर मध्ये youtube.com सर्च करावे।
2⃣you tube ओपन झाल्यावर मोबाइलमध्ये - उजव्या कोपर्यात वर video ,search याचे चिन्ह दिसेल।
3⃣video चिन्हावर click करुन त्यातून आपल्या मोबाइल मधील upload करणाऱ्या video निवडा
4⃣Title मध्ये तुमच्या video चे नाव लिहा।व public करुन उजव्या कोपर्यातील बाणावर click करावे।
5⃣ video upload होई पर्यंत थाबवे।
6⃣ upload video च्या उजव्या बाजूला 3 ठिबला क्लिक करुन share वर क्लिक करावे।
7⃣आपल्या you tube ची तयार झालेली लिंक दुसऱ्याना पाठवावी।
8⃣ तुमचे नाव व फोटो दिसेल नसेल तर अपलोड करा.
9⃣ *टीप-दुसर्याचे video आपल्या चैनल वर अपलोड केल्यास आपले चैनल block केले जाऊ शकते*
*🌎!! व्हाट्स अँप कॉम्पुटरवर चालविण्यासाठी काय करावे ? !!🌎*
1. तुमच्या कॉम्पुटर वर इंटरनेट चालू असल्याची खात्री करा.
2. कॉम्पुटरवरील ब्राऊजर(इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स यापैकी कुठलेही) ओपन करा.
3. https://web.whatsapp.com/ हि लिंक ब्राऊजर मध्ये ओपन करा, यात एक बारकोड असलेले पेज ओपन होईल.
4. आता मोबाईलमधील व्हाट्सअप app उघडा
5. ऑप्शन्स मध्ये जाऊन WhatsApp Web वर टॅप करा.
6. बारकोड स्कॅनिंग साठी कॅमेरा चालू होईल.
7. कॉम्पुटर वरील ब्राऊजर मध्ये असलेला बारकोड स्कॅन करा
8. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचे व्हाट्सअप ची मोबाईल प्रमाणे स्क्रीन कॉम्पुटर च्या ब्राऊजर वर दिसेल आणि तुम्ही कॉम्पुटर वर व्हाट्सअप वापरू शकतात.
संगणकाला पासवर्ड प्रोटेक्शन द्यावयाच्या स्टेप्स 1.Open the Control Panel.
2.Click "User Accounts".
3.Make a new user account or if the existing one is yours then skip this step.
4.Click on your account.
5.Click on Create password or "Change Password".
6.Choose a strong password which cannot be guessed. ...
7.Enter the password again to confirm it.
8.Click on Create password.
No comments:
Post a Comment