Saturday, 6 July 2019

*मतदान जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी घेतला मतदानाचा वेगळा अनुभव.*

 एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर *आमची शाळा ,आमचे उपक्रम* या अंतर्गत *मा. संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख सर यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून लोकशाही  पद्धतीने शालेय प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली* प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  इयत्ता चौथी वर्ग शिक्षक श्री चतुर बापू ,श्रीमती जिजा ताडगे ,श्रीमती वृषाली जाधव ,श्रीमती पद्मावती गडाख .यांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले .  दरवर्षी शालेय प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवून निवडले जातात. निवडणुकी प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने लोकसभा व विधानसभा यामध्ये ज्या पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली जाते .त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना याप्रसंगी देण्यात आला .निवडणूक जाहीर करणे ,वर्ग पातळीवर मंत्री मंडळ स्थापना करणे ,मतदार यादी बनवणे ,उमेदवारांचे अवेदन फॉर्म भरणे, छाननी करणे, माघार घेणे ,चिन्ह वाटप ,मतदान प्रचार ,प्रत्यक्ष मतदान करणे, मतदानाची ठिकाण ठरविणे,मतमोजणी निकाल जाहीर करणे. निवडून आलेल्या उमेदवाराला मंत्रिपदाची शपथ देणे ही सर्व प्रक्रिया याप्रसंगी राबविण्यात आले .ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी *निवडणूक आयुक्त म्हणून संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख सर, तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री  उदय कुदळे सर व झोनल ऑफिसर म्हणून शाळेतील श्री बापू चतुर यांनी भूमिका पार पाडली. याप्रसंगी *इयत्ता चौथी मधून विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी पुढील प्रमाणे होते .चि. साई संदीप गडाख  कु. स्वामिनी अनिल गुरूळे (४थी. अ) चि. प्रथमेश नवले कु . मयुरी भास्कर सांगळे (४थी ब) चि. दिनेश गुलाब वाडले कु. आदिती रवींद्र कुडेकर(४थी.क)चि. हर्ष किरण चकोर कु . साक्षी मगन साळवे (४थी.ड) हे निवडणूक उमेदवार शालेय पंतप्रधान पदासाठी निवडणूक रिंगणात उभे होते.* प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दोन मतदान केंद्र लावण्यात आले .प्रथम मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून श्री.काकुळते व्हि.डी. मतदान अधिकारी म्हणून बनसोडे सर,सुके सर चव्हाणके सर यांनी कामकाज पाहिले .तर बूथ क्रमांक दोन वर  केंद्राध्यक्ष म्हणून श्रीमती सोनजे जयश्री , मतदान अधिकारी म्हणून मुळे सर ,पवार सर, भालेराव सर ,यांनी कामकाज पाहिले .
विद्यार्थ्यांनां प्रत्यक्ष मतदान कसे होते. त्यासाठी काय करावे लागते. योग्य उमेदवार कसे निवडायचे ,प्रचार कसा करावा, याचे प्रत्यक्ष अनुभव देण्याचा शाळेने प्रयत्न केला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर शाळेतील शिक्षक लोहकरे पांडुरंग ,कोकाटे सुधाकर  ,नागरे मंदा, गुरुळे भास्कर,  शिंदे कविता यांनी मतमोजणी करून , उमेदवाराच्या मतदानाचा निकाल जाहीर केला. इयत्ता चौथी ड तुकडी मधील चि.हर्ष चकोर, कु. साक्षी साळवे हे विद्यार्थी विजयी झाले. संस्थेचे सेक्रेटरी मा. राजेश गडाख सर, मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर ,श्री बापू चतुर  यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना  निकाल घोषित करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
*संस्थेची सेक्रेटरी मा. राजेश गडाख सर यांनी निवडणुकीसाठी उभे मतदारांना मतदान करून पुढे भविष्यात प्रामाणिकपणे योग्य उमेदवाराला मतदान करा. व समाजासाठी सेवा वृत्ती जोपासली जावी. आपले एक मत किती महत्त्वाचे आहे. याबद्दल विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून व्यक्त केले.*
प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर यांनी विद्यार्थ्यांना मतदान कसे करावे .मतदान प्रक्रिया कशी राबवावी .याविषयी शिक्षक ,विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन करून, मतदान जागृती अभियान यशस्वी केले .याप्रसंगी शाळेतील कब. बुलबुल च्या विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकाचे काम छान पार पाडले .शाळेतील चित्रकला शिक्षिका श्रीमती राहणे मॅडम, क्रीडा शिक्षक श्री. कनोजिया सर, व्यवस्थापक श्री. सोमनाथ थेटे सर ,श्री. बलक सर ,संदीप गडाख, शिवाजी कांदळकर आधी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मतदान जागृती अभियाना अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

    *शब्दांकन*
   श्री बापू चतुर  (उपशिक्षक) *एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर*




Saturday, 8 September 2018

बैलपोळा उत्सव

बैलांसोबत सण साजरा करीत चिमुकल्याचा आनंद द्विगुणि
सिन्नर: यांत्रीकीकरण व पशूधनाची कमतरता यामुळे शेतकरी कुटूंबाकडेही बैलं दिसेनासे होत आहेत. म्हणून शाळेतील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सजलेली बैलजोडी प्रत्यक्ष बघणेही शक्य होत नाही. येथील एस. जी. प्राथमिक शाळेत मात्र सजलेली बैलजोडी व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची शेतकरी वेशभूषेत नटून थठून येऊन शेतकरी गीतावर नृत्यही सादर करीत बैलपोळ्याचा आनंद द्विगुणित केला.
लोकशिक्षण माध्यमिक शिक्षण संस्थेचे सचिव राजेश गडाख यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सण उत्सव व परंपरा यांची माहिती व्हावी, यासाठी दरवर्षी विद्यालयात पोळा वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा करण्याची संकल्पना अंमलात आणली व यावर्षीही ती राबवली गेली.
शनिवारी सकाळपासूनच शाळेत संपूर्ण वातावरण ग्रामीण खेड्यासारखे निर्माण करण्यात आले होते. प्रवेशद्वारावर तोरण बांधून शेतकरी वेशभूषेतील विद्यार्थी स्वागत करीत होते.
मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर गुरूळे, सागर भालेराव, सुधाकर कोकाटे, मंदा नागरे यांच्या नियोजनातून पार पडलेल्या पोळा उत्सवात सर्व विद्यार्थ्यांना पोळा सण समजून घेता आला. पालक बाळासाहेब गवळी यांनी सजलेली खिल्लारी बैलजोडी आणली होती. सर्जा-राजाचा तो रूबाब बघून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाला उधान आले होते. 'धरतीची आम्ही लेकरं...' ही चौथीची कविता नृत्यरूपाने विद्यार्थ्यांनी सादर करत वातावरण अधिकच खुलले. छोटे छोटे चिमुकले रुबाबदार शेतकरी वेशभूषेत मिरवत होते. जीजा ताडगे व सागर भालेराव यांनी बैलपोळा सणाची पार्श्वभूमी स्पष्ट करून माहीती दिली.मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर गुरूळे, सागर भालेराव, सुधाकर कोकाटे, मंदा नागरे यांच्या नियोजनातून पार पडलेल्या पोळा उत्सवात सर्व विद्यार्थ्यांना पोळा सण समजून घेता आला. पालक बाळासाहेब गवळी यांनी सजलेली खिल्लारी बैलजोडी आणली होती. सर्जा-राजाचा तो रूबाब बघून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाला उधान आले होते. 'धरतीची आम्ही लेकरं...' ही चौथीची कविता नृत्यरूपाने विद्यार्थ्यांनी सादर करत वातावरण अधिकच खुलले. छोटे छोटे चिमुकले रुबाबदार शेतकरी वेशभूषेत मिरवत होते. जीजा ताडगे व सागर भालेराव यांनी बैलपोळा सणाची पार्श्वभूमी स्पष्ट करून माहीती दिली.

Thursday, 23 August 2018

उपक्रम व स्पर्धा


 👑*एस जी पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात रोवला गेला एक मानाचा तुरा* 👑
🏆!!उपक्रम व स्पर्धा!!🏆
*वंडरबुक आँफ रेकॉर्डस,लंडन आणी genius book ऑफ रेकॉर्डस  मध्ये झाली नोंद .....* 🏆🏆.🏆
निमित्त होते,जगप्रसिद्ध अदिवासी वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा याच्यां स्मरणार्थ आयोजीत करण्यात आलेल्या *"आँन द स्पाँट वारली "* चित्र स्पर्धेत  सहभाग व बक्षिस पात्र विद्यार्थ्याचीं झालेली  निवड . माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे  , सेक्रेटरी  व निमा संचालक   मा.श्री.राजेश गडाख    सर याच्यां मार्गदर्शना खाली व
 प्राथमिक विभागाचे मुख्या. श्री . उदय कुदळेे  सर याच्यां नियोजनातून    स्पर्धेत सहभाग घेण्यात आला   होता.
दि 22 ऑगस्ट 2018 रोजी *जगप्रसिद्ध आदिवासी वारली चित्रशैलीची*  ऑन द स्पॉट  चित्रकला स्पर्धा.

ठिकाण :- आर.पी. विद्यालय ,पंचवटी नाशिक .
50 विद्यार्थ्यांचा  सहभाग
जाहीर झालेल्या निकालात
*एस. जी. पब्लिक स्कुल ,प्राथमिक विभाग सिन्नर*  च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी.
*५ ते ७ या वयोगटात*
कु. खळदकर नंदिनी शरद , इ 3 री  तुकडी  ड  हीचा *प्रथम क्रमांक* आला आहे.
नंदिनीला  750 /- रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह  व सॅर्टीर्फिकेट मिळाले .
तसेच *उत्तेजनार्थ* पारितोषिक म्हणून विद्यालयातील
1. सृष्टी शिवाजी गाडेकर .इ -३री तु-अ
2. वेदांत  नवनाथ गडाख .इ-३री तु -अ
दोघेही विद्यार्थी बक्षिस पात्र ठरले आहेत . यांना  प्रत्येकी 150/- रुपये रोख रक्कम व सॅर्टीर्फिकेट मिळाले.*शाळेला  रेकॉर्डसचे 2 प्रमाणपत्र मिळाले.*
यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे ,शिक्षकांचे , पालकांचे *माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक   मा. नानासाहेब गडाख , सेक्रेटरी  व निमा संचालक   मा.श्री.राजेश गडाख सर*   *मा.शिवनाथ निर्मळ साहेब* गटशिक्षणाधिकारी  पंचायत समिती सिन्नर *मा. सौ मंजुषा सांळूके मँडम** केद्रंप्रमुख श्री.भुजबळ सर* *प्राथमिक विभागाचे मुख्या. श्री . उदय कुदळे सर*
यांचे कडून *हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा* 💐💐💐
  स्पर्धेसाठी शाळेतील  मुख्याध्यापक श्री उदय कुदळे सर, शिक्षक  सौ.रहाणे कल्याणी मँडम, श्री.बापू चतुर  ,श्री पांडुरंग लोहकरे ,श्री.सुधाकर कोकाटे,श्री सागर भालेराव,  सर यांचे  मार्गदर्शन लाभले. व शाळेतील सर्व सहकारी शिक्षकांनी  सहकार्य केले.

Thursday, 12 July 2018

वृक्ष लागवड संमारभ


* १३ कोटी वृक्ष लागवड व संवर्धन संमारभ *
दिनांक -१२/०७/२०१८ ठिकाण- एस .जी. पब्लिक स्कूल [प्राथमिक विभाग]सिन्नर धर्मादाय आयुक्त कार्यालय नाशिक, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर ,
जिल्हा परिषद शिक्षण विभाग [प्राथमिक] नाशिक,वने व सामाजिक वनिकरण
विभाग सिन्नर यांचे संयुक्त विद्यमाने..एस.जी. पब्लिक स्कूल सिन्नर [प्राथ. विभाग ] येथे  १३ कोटी वृक्ष लागवड व संवर्धन संमारभ  नुकताच ,मा. डॉ.सौ .वैशाली झनकर madam  [मा.शिक्षणाधिकारी, {प्राथ.} जि.प.नाशिक] यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडला .याप्रसंगी मा.शिवनाथ निर्मळ साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिन्नर , मा .सौ. मंजूषा सांळुके madam बीट विस्तार अधिकारी सिन्नर  , मा.श्री .सोनवणे साहेब [वन परिक्षेत्र अधिकारी ,सामाजिक वनिकरण सिन्नर] व त्यांचे सर्व स्टाफ ,मा.श्री.राजेश सूर्यभान गडाख [सेक्रेटरी, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर]  मा. श्री .कुदळे उदय चिंधू [मुख्याध्यापक,एस .जी. पब्लिक स्कूल सिन्नर [प्राथ. विभाग ]  यांच्या उपस्थितीत पार पडला .प्रथम मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण  करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात ज्ञान माता सरस्वती मातेच्या व  ज्ञान ज्योती  सावित्रीबाई फुले  च्या  प्रतिमेचे पूजन करून  करण्यात आली .मान्यावरांचा सत्कार मा.श्री.राजेश सूर्यभान गडाख [सेक्रेटरी, माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर] यांचे  हस्ते करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री .कुदळे उदय चिंधू [मुख्याध्यापक,एस .जी. पब्लिक स्कूल सिन्नर [प्राथ. विभाग ] यांनी केले . मा. डॉ.सौ .वैशाली झनकर madam  [मा.शिक्षणाधिकारी, {प्राथ.} जि.प.नाशिक] यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना अनमोल असे मार्गदर्शन केले .सर्व विद्यार्थी हे अध्यन स्तरापर्यत पोहचले पाहिजे .शाळेच्या गुणवत्ता  व शैक्षणिक विकास बघून उत्तम प्रगती आहेत ,हे बघून समाधान व्यक्त केले .वर्ग पाहणी करून वर्ग रचना ,स्मार्ट क्लासवरील अध्यापन, बोलके फलक ,शाळेतील झाडे बघून सुंदर शाळा म्हणून कौतुक केले . विद्यार्थीशी सवांद साधला . मा.निर्मळ साहेब यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व  व काळजी घेण्यास सांगून मार्गदर्शन  केले .मा. संस्थेचे सेक्रेटरी राजेश सर  यांनी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी यथोचित असे विविध शैक्षणिक उपक्रम  दरवर्षी राबवले  जातात .मा.नानासाहेब यांनी लावलेल्या या वटवृक्षाचे जतन करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आमचे प्रयत्न चालू आहेत  .याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री.चतुर बापू व श्री .विनायक काकुळते  यांच्या दिनविशेष फलकलेखनाचे कौतुक करून मा.वैशाली झनकर  madam व निर्मळ साहेब आदि सर्व मान्यवराचे  हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  श्री विनायक काकुळते व पद्मा गडाख  यांनी केले .तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी  शाळेतील सर्व शिक्षक   व शिक्षकेतर  कर्मचारी यांनी सहकार्य  केले .
शब्दांकन –श्री .चतुर बापू कारभारी [sgps, sinnar]

Wednesday, 9 May 2018




आमचे मार्गदर्शक 



श्री ,उदय  चिंधू  कुदळे  

मा . मुख्याध्यापक 
एस.जी .पब्लिक स्कूल सिन्नर 
[प्राथमिक विभाग]  

Wednesday, 19 July 2017

माझी शाळा

         माध्यमिक लोकशिक्षणं मंडळ सिन्नर ,  संचलित ,

  एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर

        आज महाराष्ट्रात औद्योगिक नगरी म्हणून नावारूपास येत असलेल्या सिन्नर नगरीच रूप बदलत चाललेले आहेत. मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग ,उच्च शिक्षित वर्ग सिन्नर  उपनगरात स्थायिक  आहे. नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर, नवीन शैक्षणिक विचारप्रवाहांचे बदलते स्वरूप ,हे आजच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्ये बनत चालले आहे .त्यानुसार विविध शैक्षणिक संकुले बदलत आहे. नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण शिक्षणाकडे वाटचाल करताना दिसायला पाहिजे. याप्रमाणेच त्यांचा विकास होण्यासाठी सिन्नर मधील एस .जी .पब्लिक स्कूल नेहमीच प्रयत्न करीत असते .शाळा ही आनंददायी व अर्थपूर्ण अनुभव देणारी असावी या हेतूने माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित एस. जी .पब्लिक स्कूल प्राथमिक /माध्यमिक विभाग सिन्नर मध्ये अखंडपणे कार्य करत आहे .या वाटचालीत संस्थेने काळाची पावले ओळखून नेहमीच नवीन नवीन उपक्रम विचारपूर्वक राबवते ,शिक्षण जीवनानुभव देणारे असावे. यासाठी नेहमी प्रयत्न करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सिन्नर भूषण सूर्यभान गडाख (नानासाहेब )यांनी माध्यमिक लोक शिक्षण मंडळ सिन्नर या संस्थेची स्थापना केली .
विद्यार्थी ,पालक, शिक्षक हे कोणत्याही संस्थेचे अविभाज्य घटक आहेत ,ते समाजापासून वेगळे होऊ शकत नाही .ह्या तीनही घटकांमधील संवाद सुरू व्हावा .यासाठी ही संस्था ,शाळा नेहमीच उपक्रम राबवत असते. शाळेचे प्रयत्न समाजा पर्यंत पोहोचवावेत ,त्याचबरोबर समाजातील वेगवेगळ्या सर्जनशील उपक्रमांची संवाद साधावा यासाठी एस.जी.पब्लिक स्कूल नेहमीच प्रयत्नशील असते. संस्थेच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीत नवनिर्मितीचा आनंद, त्यासाठी चाललेली अखंड धावपळ ,सतत काहीतरी नवनिर्मिती करण्याची ऊर्मी, कल्पकतेने तयार होणाऱ्या संकल्पनेच्या पूर्तीसाठी, डोंगराएवढे काम करताना सतत सर्वांच्या पाठीमागे घट्ट पाय रोवून ताकद देणारे संचालक मंडळ व शाळेचे व्यवस्थापन पाहणारी कुशल व्यवस्थापक मुख्याध्यापक यांचे नेतृत्व नेहमीच सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांनां मार्गदर्शन व प्रेरणादायी ठरणारे असे आहे .कोणतेही काम नेटाने वेळेत करण्याच्या वृत्तीमुळे शाळेची प्रगती दिवसेंदिवस वाढतच आहे .शिक्षण व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे. शिक्षकांच्या मध्ये असणारे गुणांच्या विकासाबरोबर त्यांचे शिकवणे अधिक समृद्ध होत गेले पाहिजे .आपण विद्यार्थ्यांनां बरोबर घेऊन शिक्षण प्रक्रिया सोपी करू शकतो. हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी  जवळीक साधत अध्ययन-अध्यापन सर्जनशील झाले आहे .या सर्व शैक्षणिक प्रक्रियेत पालकांच्या उत्स्फूर्त सहभाग व आपल्या पाल्याची सर्वांगीन प्रगती पाहून, झालेला आनंद त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमधून जाणवतो .एस.जी. संकुलाचे शैक्षणिक प्रयोग ,उपक्रम ,इतर कार्यक्रम, सर्व शिक्षण प्रेमी पर्यंत पोहोचावे. आणि इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरावे यासाठीच हा लेखन प्रपंच. 1992 साली सिन्नर तालुक्यातील पहिल्या व एकमेव आधुनिक शैक्षणिक  व भौतिक सुविधा युक्त एस.जी.पब्लिक स्कूलची स्थापना केली .मा.श्री सूर्यभान गडाख (नानासाहेब) यांच्या दुरदृष्टीने विचार करून तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या मुलांना शहरी सोयी उपलब्ध करून दिल्या ,इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला गेला .
पुढील वाटचालीस संस्थेची प्रगती होत असतानाच ,संस्थेचे सेक्रेटरी मा. राजेशजी  गडाख साहेब व संचालक मंडळ ,मा.मुख्याध्यापक  श्री.उदय कुदळे सर , शिक्षक, विद्यार्थी हे नवीन नवीन बदल स्वीकारण्यास नेहमी तत्पर असतात. यामधील काही ठळक बाबींचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते .
*डिजिटल तंत्रज्ञान स्मार्ट क्लास*
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न पाहत असतानाच शाळेत संस्थेचे सेक्रेटरी मा. राजेश गडाख सर यांच्या स्मार्ट  संकल्पनेतून डिजिटल तंत्रज्ञान शाळेत उपलब्ध करून दिले .डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे .सर्वच वर्गात स्मार्ट क्लास  एस.जी.किड्सच्या विद्यार्थ्या पासून ते बारावीपर्यंत विद्यार्थीं अध्ययनाचे धडे गिरवताना दिसतात .शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ झाले. ऑनलाईन माहिती सर्च करून आपले अध्ययन अनुभव विद्यार्थी दृढ करतात .आता सर्व शाळा डिजिटल तंत्रज्ञानाकडे वाटचाल करताना दिसत असताना दहा वर्षापूर्वीच मा.राजेश गडाख सर यांनी ई लर्निंग डिजिटल तंत्रज्ञान राबवले असून ,अद्यावत ज्ञान विद्यार्थी घेत आहे .
*शाळेचे आणखीन काही वैशिष्ट्ये*
*सहशालेय व सांस्कृतिक कार्यक्रम*
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेत नेहमीच असे विविध उपक्रम राबवले जातात .वर्षभरातील भारतीय संस्कृती मधील विविध सण ,उत्सव, परंपरा नुसार चालणारे वैशिष्ट्यपूर्ण असे उपक्रम शाळेत राबवले जातात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्व सांगून नव्याचा ध्यास व जुन्या परंपरांचा अट्टाहास न करता मुलांना उपयुक्त ठरेल या दृष्टीने महत्त्व देऊन सण उत्सव साजरे केले जातात .यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव म्हणजे बैलपोळा होय.बैलपोळा सण साजरा करताना शहरी मुलांना ग्रामीण जीवनाची माहिती व्हावी. बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समाजात एकता राखण्यासाठी हे सण उत्सव कशी उपयोगी ठरतात हे प्रत्यक्ष देखाव्यातून सादर केले जाते .शेतीची अवजारे ,शेतकरी बांधवांकडून आणली जातात. समाजात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला जातो .उदाहरणार्थ कांदा भाव प्रश्न ,समृद्धी महामार्ग चा प्रश्न, शेती वाचवा ,शेतकरी वाचवा ,यासारखा ज्वलंत प्रश्नावर समाज जागृती करण्यावर भर असतो.
*सहशालेय शैक्षणिक सहली व क्षेत्रभेट*
एस.जी संकुल म्हणजे अध्ययन अनुभवांची खानच, हे जेवढे परिसरातून घेता येईल तेवढे ज्ञानाचे अनुभवाचे कण  येथील विद्यार्थी वेचण्यासाठी नेहमीच आतुर असतो .त्याचाच एक भाग म्हणजे क्षेत्रभेट होय.शाळेत जून पूर्वीच वर्षभराचे नियोजन करून त्याप्रमाणे सिन्नर व जवळपासची ठिकाणे निवडली जातात .त्यामध्ये साखर कारखाना ,पवनचक्की, ईशानेश्वर मंदिर, आर्टिलरी सेंटर नाशिक, तारांगण ,उत्पादक कारखाने, नगरपालिका ,पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस ,बँका अशा ठिकाणांची निवड करून मुलांचे ज्ञान बाह्य जगताशी दृढ करण्यावर भर असतो .याप्रमाणेच वर्षभरातून एकदा विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. शिवनेरी ,औरंगाबाद दर्शन,  पुणे दर्शन ,प्राणीसंग्रहालय तसेच कोल्हापूर ,सातारा ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे दाखवून विद्यार्थ्यांचे अनुभव  पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापनाशी सांगड घालण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलांचे जीवना अनुभव समृद्ध होतात. मंत्रालय, विधान भवन ,राजभवन यासारखे मुबई येथील  राजधानी मधील ठिकाणे दाखवून प्रत्यक्ष कारभार कसा चालतो, त्याचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना सहलीतून दिले जाते
*दिनविशेष*
शाळेमध्ये नेहमी राष्ट्रीय थोर महापुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथी उत्सव व वर्षाभरातील विविध   दिनविशेषाचे नियोजन करून प्रत्यक्ष जबाबदारी वाटप करून कारवाई केली जाते .वर्षारंभी नियोजन असल्यामुळे प्रत्येक वर्ग शिक्षकांना व विद्यार्थ्यांनां नियोजन करणे सोपे जाते. या कार्यक्रमात विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतात. सभाधीटपणा वाढण्यास मदत होते .थोर पुरुषांची ओळख होते, त्यांचे कार्य समजते.
*माझी शाळा, माझा फळा*
हे संकुलाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील दर्शनी भागातील पडवीत असलेले 15 फळे होईल हे सर्व फलक नेहमीच नवीन नवीन दिनविशेष यानुसार रंगीत खडूने रंगवले जातात. त्यावर बोलकी चित्र काढून, शाळेतील वातावरण चैतन्यमय असते .शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री चतुर बापू व अन्य सहकारी शिक्षक विनायक काकुळते हे नेहमीच फलक लेखन करीत असतात .त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा व मार्गदर्शन मिळत असते .त्यांचा चित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. निरीक्षण क्षमता वाढते .

*सुंदर शाळा, स्वच्छ शाळा*
शिस्त, स्वच्छता, टापटीपपणा या त्रिसूत्रीचा वापर करून स्वच्छ शाळा सुंदर शाळा या मंत्राची नेहमीच येथे प्रत्यक्ष कारवाई होताना दिसते .रोजच्या रोज सर्व सतरा तुकड्यांमध्ये आठवड्याच्या वाराप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवली जाते. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे शाळेचे सौंदर्य नेहमीच रमणीय असते.

*विविध स्पर्धांचे आयोजन*
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी शाळेत नेहमी शाळा अंतर्गत व बाह्य स्पर्धा आयोजित केले जातात. त्यात विद्यार्थी भाग घेऊन बक्षीस पटकवतात. यामध्ये नवनीत चित्रकला स्पर्धा ,विविध शासकीय स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,काव्यवाचन स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, आकाश कंदील बनवणे ,पतंग महोत्सव तसेच मा. नानासाहेब गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात ,राखी बनवणे स्पर्धा ,यासारखे स्पर्धा राबवून  मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यास चालना दिली जाते. वार्षिक पारितोषिक कार्यक्रमात बक्षिस पात्र विद्यार्थानां सन्मानित केले जाते.

*संगीत, खेळ ,कला शिक्षण*
शाळेतील संगीत क्लास विद्यार्थ्यांसाठी एक मेजवानीच असते आठवड्यांचे तासिका नियोजन करून संगीत दालनात विद्यार्थी नेहमी जाण्यास तयार असतात .तबला-पेटी यांचे शास्त्रीय पद्धतीने ज्ञान दिले जाते. तसेच कलेचीही चित्रकला मुलांचा आवडता विषय आठवड्यातून प्रत्येक तुकडीला तासिका वाटप करून त्याप्रमाणे चित्रकलेची तास घेतले जातात. विविध खेळ , क्रीडा शिक्षक शिकवत असतात.

*सुंदर शाळा ,हरित शाळा*
जशी घराची पारख घरासमोर अंगणावरून होते ,तसेच शाळेचे बाह्य स्वरूपावरून आतील अंतरंग शाळेचे सहज समजते. शाळेचे बाह्य परिसरात झाडे लावून सर्व परिसर हरित झाला आहे दोन एकर जागेत फळ लागवड करून आंबा वड नारळ चिकू अशा फळांची झाडे लावून शाळेची शोभा वाढली आहे. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लहानपणीच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन यांचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात.

*पालक मेळावा*
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रथम प्राधान्य देऊन ,त्यांच्या ज्ञानार्जानासाठी  पालक-शिक्षक यामध्ये सुसंवाद साधावा यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केले जाते .प्रत्यक्ष पेपर दाखवून विद्यार्थी चुका लक्षात आणून दिल्या जातात .शनिवार हा पालक भेटीचा दिवस ठरवून, पालकांच्या समस्या सोडवल्या जातात.
*विज्ञान मेळावा*
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा ,वैज्ञानिकता जागृत व्हावी. यासाठी विज्ञान मेळावे आयोजित केले जाते. प्रात्यक्षिक ,प्रयोग करून विद्यार्थी शाळेतील सायन्स हॉलमधील प्रात्यिक्षिकाचा अनुभव  घेतात .राज्यस्तरापर्यंत येथील विज्ञान मॉडेल ची निवड झाली असून जिल्हास्तर व तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम द्वितीय क्रमांक पटकावले आहे.
*शालेय प्रतिनिधींची निवड*
शाळा भरण्याच्या वेळी वर्षारंभी विद्यार्थ्यांमधून शालेय प्रतिनिधींची निवड प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया घेऊन राबवली जाते .प्रत्यक्ष मतदान करून ,सभा प्रचार घेऊन, उमेदवार निवडले जातात. राजकीय रंग न देता ,वैचारिक पातळीवर कसे निवडून यावे. यासाठी धडे दिले जातात. मत मोजणी पद्धत शिकवली जाते.निकाल घोषित करून सन्मानपत्र बहाल केले जाते,वर्षभरातील सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी  म्हणून उपस्तिती असते.
*ज्ञानरचनावादी अध्यापन*
शाळेतील विद्यार्थ्यांना समजपूर्वक आकलन व्हावे. यासाठी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष वस्तू हाताळून विद्यार्थी ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन करतात.
अशा विविध उपक्रम राबवले जात असतानाच, सर्व वर्गात सेमी इंग्रजी  पध्दतीने अध्यापन केले जाते.तज्ञ व्यक्ती बोलावून मुलांना मार्गदर्शन घडवून आणले जाते. आजच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन आव्हाने स्वीकारत असताना, तंत्रज्ञानाच्या जगतामधील विद्यार्थी टिकला पाहिजे ,तो शिकला पाहिजे व जीवनात यशस्वी जगला पाहिजे. यासाठी एस.जी.पब्लिक स्कूल हे नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन तालुक्यातील विद्यार्थ्यांनां घडवत राहिल .सिन्नर तालुक्याच्या विकासातील एक घटक बनण्याचा सतत प्रयत्न करेल.

शब्दाकंन-श्री.बापू कारभारी चतुर
यंशवंतनगर सिन्नर